S M L

मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन मंजूर

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2017 03:37 PM IST

मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन मंजूर

25 एप्रिल :  2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या साडेआठ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहला आज मुंबई हाय कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्याचवेळी, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर साध्वी प्रज्ञाची सुटका करण्यात येणार आहे.

2008साली मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.

साध्वीविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा देत एप्रिल 2016 मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचीट देत आरोपींवरील ‘मकोका’ हटवला होता. एनआयकडून क्लिन चीट मिळाल्यानंतर साध्वीने एनआयएच्या विशेष कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज सुनावणी झाली असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 12:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close