विषारी कीटकनाशकांमुळे विदर्भातील मृतांचा आकडा 35वर पोहोचला!

विषारी कीटकनाशकांमुळे विदर्भातील मृतांचा आकडा 35वर पोहोचला!

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात दोन, भंडारा जिल्ह्यात दोन, अकोल्यात जिल्ह्यात पाच, बुलढाण्यात एक, अमरावतीत दोन तर यवतमाळ जिल्ह्यात २० जणांनाआपले प्राण गमवावे लागले आहेत

  • Share this:

06 ऑक्टोबर: विदर्भात शेतातील पिकांवरील रोगराई आणि कीड रोखण्यासाठी केलेल्या फवारणीमुळे १ ऑगस्ट ते आतापर्यंत तब्बल ३5 शेतकरी- शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे.या कीटकनाशकांच्या वापराबद्दल कुठलीच सुचना या शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती.

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात दोन, भंडारा जिल्ह्यात दोन, अकोल्यात जिल्ह्यात पाच, बुलढाण्यात एक, अमरावतीत दोन तर यवतमाळ जिल्ह्यात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर एक १९ वर्षीय शेतकरी अत्यवस्थ असून त्याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहे.

विदर्भातील कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यु प्रकरणावर नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कपाशीला आळ्यांचा प्रादुर्भाव झाला म्हणून अनेक शेतकऱ्यांनी या कीटकनाशकांचा वापर केला. पण या कीटकनाशकांचा घातक परिणाम कीटकांच्याऐवजी माणसांच्याच जीवावर झाला. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कम्युनिस्ट पक्षाचे जम्मू आनंद यांनी ही याचिका दाखल केली आहे. संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी तसंच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 20 लाख रूपये मदतीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

राज्य सरकारने या प्रकरणातील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहिर केली आहे पण ही मदत तोकडी असल्याचं सांगत सुकाणू समितीने शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 09:36 AM IST

ताज्या बातम्या