News18 Lokmat

जनआक्रोश मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये चंद्रपुरात गटबाजी

मात्र त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलियांनी दुसरा समांतर मेळावा आणि रॅली आयोजित केलीय. या घटनेमुळे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2017 11:53 AM IST

जनआक्रोश मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये चंद्रपुरात गटबाजी

चंद्रपूर,06 नोव्हेंबर: काँग्रेसचा नागपूर विभागीय जनआक्रोश मेळावा आज चंद्रपूरच्या 'चांदा क्लब' मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी कांग्रेसचे जेष्ट नेते माजी खासदार नरेश पुगलियांनी दुसरा समांतर मेळावा आणि रॅली आयोजित केलीय. या घटनेमुळे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चंद्रपूर शहरात असतानाच जिल्ह्यातील काँग्रेसचे २ गट पडले आहे. आज २ वेगवेगळे कार्यक्रम घेणार असल्याने भाजपविरोधातही काँग्रेसची दुफळी गटबाजीमुळे कायम असणार आहे. चंद्रपुर जिल्हा एकेकाळचा कांग्रेसचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे .सध्या मात्र कांग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागल्याचं चित्र आहे.

इंदिरा गांधीपासून कांग्रेसची धुरा सांभाळणारे माजी खासदार नरेश पुगलिया आणि विधानसभेचे काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांच्यात राजकिय संघर्ष सुरु झाला आहे.आता काँग्रेसने राज्यभर आक्रोश सभा घेण्याचं नियोजन केल्यानंतर चंद्रपुरात मंगळवारी विभागीय आक्रोश सभा होत असताना ही गटबाजी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसमोर उफाळून येणार आहे.

६ नोव्हेंबरच्या आक्रोश सभेसाठी कांग्रेसचे विधानसभेतले उपनेते विजय वडेट्टीवारांनी पुढाकार घेऊन तयारी सुरु केलीय. मात्र ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया या आयोजनापासून दूर आहेत. त्यांनी इंदिरा गांधीच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वतंत्र कार्यक्रमांची मालिका सुरू केली आहे. इतकंच नाही तर ते ६ नोव्हेंबरलाच आक्रोश सभा सुरू असतानाच पुगलियांच्या नेतृत्वात काँग्रेसची दुसरी रॅली आणि धरणे आंदोलन होणार आहे

एकूणच काँग्रेसची 'जन आक्रोश सभा' असली तरी पक्षांतर्गत आक्रोश उफाळून आल्याचं चित्र असून कार्यकर्त्यांची मात्र गोची झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...