S M L

कोकणच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात 2 सुरक्षा बोटी

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात दोन इंटरसेप्टर बोटी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा बंदरात, या दोन सुरक्षा बोटी तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झाल्या.

Sonali Deshpande | Updated On: Sep 20, 2017 05:52 PM IST

कोकणच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात 2 सुरक्षा बोटी

उदय जाधव, रायगड, 20 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात दोन इंटरसेप्टर बोटी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा बंदरात, या दोन सुरक्षा बोटी तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झाल्या. त्यामुळे कोकणच्या समुद्र किनाऱ्याला आता सुरक्षा कवच मिळालंय.

मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईभोवती नौदल आणि तटरक्षक दलाने सुरक्षा कडे उभारले. पण मुंबईला लागूनच असलेला कोकणचा समुद्र किनारा मात्र तितका सुरक्षित नव्हता. आता सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात दोन सुरक्षा बोट तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतीय तटरक्षक दलात तैनात झालेल्या या सुरक्षा बोटींची वैशिष्ट्य काय आहेत, त्यावर नजर टाकूयात...- इंटरसेप्टर बोट सी-433 आणि सी-434

- 27 मीटर लांब

- 136 टन

Loading...

- 45 नॉटिकल मैल वेग

- खोल समुद्रात 500 नॉटिकल मैलपर्यंत गस्त

- अत्याधुनिक नेव्हीगेशन यंत्रणा

समुद्राच्या रक्षणासाठी तटरक्षक दलाला अजून सुरक्षा बोटींची आवश्यकता असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 05:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close