मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन, 180 जादा बसेस धावणार

मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरच्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 09:27 PM IST

मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन, 180 जादा बसेस धावणार

मुंबई, 25 जुलै- मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरच्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले.

त्यानुसार एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे, येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या सुरु करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून 50, ठाणे विभागातून 50, पुणे विभागातून 70, आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून 10 अशा 180 जादा बसेस दररोज सोडण्याचे नियोजन केले आहे.

प्रवाशांना खूशखबर, एसटी बसचे आरक्षण आता 60 दिवस आधी मिळणार

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांनाही बसचं आरक्षण 60 दिवस आधी करता येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज ही घोषणा केली. गणपती उत्सवासाठी 27 जुलै पासून याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया 26 जुलै रोजी संध्याकाळी 4:00 ते मध्यरात्री 00:30 पर्यंत बंद राहणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा 2 हजार 200 बसेस जादा सोडण्यात येणार आहेत. यावेळी परतीच्या प्रवासाचं आरक्षणही आता सुरुवातीलाच करता येणार आहे. गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेचं आरक्षण सुरू होताच काही मिनिटांमध्येच संपून जाते त्यामुळे चाकरमान्यांना बस हाच पर्याय उरतो त्यामुळे वाट बिकट असली तरी लोक बसने प्रवास करतात. या काळात बसचा प्रवास हा खडतर असतो. पावसामुळे खराब झालेले रस्ते, प्रचंड वाहतूक यामुळे कोकणाकडे जाणारे सर्व महामार्ग हाऊस फुल्ल असतात. प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. बसचा प्रवास किमान सुखाचा व्हावा यासाठी उपाययोजना करण्याची मागणी दरवर्षी प्रवाशांकडून होत असते.

Loading...

शिवनेरीचे प्रवासी वाढले

याच महिन्यात मुंबई-पुणे मार्गावर धावणारी एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. कमी झालेले नवे तिकीट दर 8 जुलै पासून लागू झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एसटी महामंडळाने या बसेसच्या तिकीट दरात घट केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सीसेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवासी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल, या हेतून दरकपात करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT : मिशन राष्ट्रवादीला खिंडारमध्ये आदित्य ठाकरेंनी बजावली मोठी भूमिका!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...