जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 02:56 PM IST

जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला

जांभूरखेडा, 01 मे: गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला आहे. यासाठी IDचा वापर केल्याचे समजते.

महाराष्ट्र दिनीच दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.गेल्या वर्षी 25 एप्रिल रोजी जवानांच्या कारवाईत 40 नक्षलवादी ठार झाले होते. या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होण्याआधी हा हल्ला घडवण्यात आला आहे. त्याच बरोबर काही दिवासांपूर्वी याच परिसरात झालेल्या चकमकीत एक महिला कमांडर ठार झाली होती. आज झालेला हल्ल्यामागे या दोन घटनांचा संबंध जोडला जात आहे. दरम्यान जवानांच्या हालचालीची माहिती उघड झाल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ही गुप्त माहिती कशी उघड झाली त्याचा शोध घेऊ असे हे ते म्हणाले .यासंदर्भात ते उद्या गडचिरोलीला जाऊन आढावा घेणार असल्याचे समजते.

Loading...

27 एप्रिल रोजी ठार झाल्या होत्या महिला नक्षलवादी

27 एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जंगलात पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला होता. नक्षलवाद्यांनी पोलीस अभियानावर भुसुरुंगस्फोट घडवून हल्ला केला. या स्फोटानंतर पोलीस आणि नक्षलवाद्यांच्यात जोरदार चकमक झाली होती.

या चकमकीत जहाल नक्षलवादी रामको नरोटी आणि शिल्पा ध्रुवा या दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाआधी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा रामको नरोटी ही सुत्रधार होती. तिच्यावर 12 खुनासह 45 गुन्हे दाखल होते. रामकोवर 12 लाखांचे बक्षिस होते. ती नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीची सदस्य देखील होती.


गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची भीषणता दाखवणारा पहिला VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...