S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

औरंगाबादेत छावणी परिसरात गॅस्ट्रोचे थैमान कायम;1500 लोकांना लागण

जवळपास 1500पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोचा त्रास होतो आहे. एकाचवेळी रूग्णांचा आकडा इतका मोठा असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 13, 2017 10:18 AM IST

औरंगाबादेत छावणी परिसरात गॅस्ट्रोचे थैमान कायम;1500 लोकांना लागण

औरंगाबाद, 12 नोव्हेंबर : औरंगाबाद शहरातील छावणी भागात अचानक  नागरिकांना उलट्या आणि पोटाचा त्रास सुरू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. शनिवारी रात्रीपासून जवळपास 1500पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोचा त्रास होतो आहे. एकाचवेळी रूग्णांचा आकडा इतका मोठा असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

पोटात दुखणे, मळमळणे आणि उलट्यांचा त्रास हा दूषित पाण्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दरम्यान  काही रूग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलंय. तर  काहींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. दरम्यान परिसरातील पाण्याचे नमुने छावणी परिषदेने तपासणीसाठी पाठवले आहेत.

रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत आहे.  परंतु जागे अभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. सध्या रूग्णांवर उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात  आलेली नाही. आज सकाळपासूनच रूग्णांनी छावणी रूगणालयात गर्दी केली आहे. त्यामुळे आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पाऊलं प्रशासन  उचलत आणि या बाधे मागचं ठोस कारण कळत का हे पाहणं  महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close