धक्कादायक! पुण्यात 21 पाळीव कुत्रे आणि मांजरांची हत्या

निष्पाप आणि मुक्या प्राण्यांच्या या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 10:19 AM IST

धक्कादायक! पुण्यात 21 पाळीव कुत्रे आणि मांजरांची हत्या

पुणे, 30 जानेवारी : पुण्यात 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देऊन मारण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येरवड्याच्या प्राईडल नगर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे.

निष्पाप आणि मुक्या प्राण्यांच्या या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.  मारण्यात आलेल्या 14 पाळीव कुत्र्यांमध्ये 6 एका वर्षापेक्षा लहान पिल्लांचा समावेश आहे. तर 6 मांजरांनाही मारून टाकलं आहे. पाळीव प्राण्यांना विकृत मानसिकतेतून मारण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात य़ेत आहे.

सोसायटीतील पाळीव प्राण्यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. ज्यांच्या प्राण्यांची हत्या झाली आहे ते पोलिसांत तक्रार देण्यास पोहचले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...