'हे' 14 पूल कधीही कोसळू शकतात

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी संसदेत जाहीर केलेल्या 147 धोकादायक पुलांच्या यादीत राज्यातील 14 पुलांचा समावेश आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2017 02:08 PM IST

'हे' 14 पूल कधीही कोसळू शकतात

प्रतिनिधी, 06 आॅगस्ट : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी संसदेत जाहीर केलेल्या 147 धोकादायक पुलांच्या यादीत राज्यातील 14 पुलांचा समावेश आहे. या पुलांची अवस्था अतिशय जीर्ण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या पुलांच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे तक्रारी केल्यात. मात्र आजवर या तक्रारींकडे दुर्लक्षच करण्यात आलंय.

यात सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी-तांदुळवाडी गावातील अरणी नदीवरील पूल, तर सांगली जिल्ह्यातील तीन पूल धोकादायक अवस्थेत आहेत. यात भोसे गावातील भोसे ओढ्यावरील पूल, मिरज आणि लांडगेवाडी पेठभागातील पूल हे धोकादायक आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील आलियाबादचा पूलही धोकादायक अवस्थेत आहे. या निजामकालीन पुलावरून आता वाहतूक थांबवण्यात आलीय. मात्र धोकादायक अवस्थेत असलेल्या या पुलाची कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नाही.

नागपूर जबलपूर हायवेवरील कन्हान नदीवरील पुलाला १४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. १८७४मध्ये हा पुल बांधण्यात आला आणि तेव्हापासून या पुलावरून वाहतूक सुरु आहे. दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा हा पुल आहे. सध्या या पुलाशेजारी दुसऱ्या एका पर्यायी पुलाचे बांधकाम सुरु आहे पण ते चार वर्षापासून संथ गतीने आहे.

'हे' 14 पूल कधीही कोसळू शकतात

- पेठ (सांगली)

Loading...

- भोसे (सांगली)

- लांडगेवाडी (सांगली)

- मिरज गावातील पूल (सांगली)

- वर्वे खुर्द (पुणे)

- मुळा नदीवरील पूल (पुणे)

- आलियाबाद पूल (उस्मानाबाद)

- बोरामणी (सोलापूर)

- काळसेनगरचा पूल (सोलापूर)

- भीमानदीवरचा पूल (सोलापूर)

- पंचगंगा नदीवरील पूल (कोल्हापूर)

- शिवणा नदीवरील पूल (औरंगाबाद)

- असना नदीवरील पूल (नांदेड)

- पांगरी पूल (नांदेड)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...