13 वर्षांच्या कुमारी मातेला न्याय मिळणार कधी?

13 वर्षांच्या कुमारी मातेला न्याय मिळणार कधी?

नागपूरजवळील काटोल परिसरात बळजबरीच्या प्रकारातून ही कुमारीमाता गर्भवती राहिली होती. पीडित कुटुंबियांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केलीय. पण या गंभीर प्रकाराची साधी दखलही घ्यायला कोणतीही संघटना तयार नाही.

  • Share this:

सुरभी शिरपुरकर, 22 मे : बाळाचे वय ४ महिने आणि त्याच्या जन्मदात्री आईचं वय १३ वर्ष. ऐकायला काहीसं आश्र्चर्यकारक वाटत असलं तरी हे खरं आहे. नागपूरजवळील काटोल परिसरात बळजबरीच्या प्रकारातून ही कुमारीमाता गर्भवती राहिली होती. पीडित कुटुंबियांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केलीय. पण या गंभीर प्रकाराची साधी दखलही घ्यायला कोणतीही संघटना तयार नाही.

मातृत्वाचा पुरेसा अर्थही न उमगलेली ही १३ वर्षांची कुमारीमाता. आपल्या आई आणि आजीसोबत काटोलमध्ये राहते. याच परिसरातल्या निखिल नावाच्या नराधमाने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यातूनच ती गर्भवती राहिली. पण वेळीच हा सगळा प्रकार लक्षात न आल्याने अॅबॉर्शन करणं मुलीच्या जीवासाठी धोकादायक बनलं. त्याचाच परिपाक म्हणून ही कोवळी पोर कुमारीमाता बनली. या चिमुकलीला तिच्यावर झालेला अन्यायही धडपणे सांगता येत नाहीये.

या कुमारीमातेची आई चार-दोन घरांची धुणीभांडी करून कसंबसं घरं चालवते. अशातच तिच्या मुलीसोबत हा असा बाका प्रसंग ओढवलाय. झाल्या प्रकाराविरोधात या मायलेकींनी पोलिसात रिसतर एफआयआरही दाखल केली होती. पण नराधम आरोपी जामीन घेऊन मोकाट फिरतोय

आता या १३ वर्षाय कुमारीमातेपुढे बाळाच्या संगेापनाचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय. कुठून तरी न्याय मिळेल या आशेपोटी या मायलेकी दारोदारी फिरताहेत.

महिला अत्याचाराच्या घटना घडल्या की आपल्याकडे अनेक संघटना हिरfरीने पुढे येतात. आंदोलनं करतात. पण या चिमुकलीसाठी अजूनतरी केाणीही पुढे आलेलं नाही. कुणी न्याय देतं का न्याय ? असं म्हणण्याची वेळ या मायलेकींवर येऊन ठेपलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2017 08:54 PM IST

ताज्या बातम्या