कोल्हापूर दुर्घटना : अर्धवट पूल 13 जणांच्या मृत्यूला कारणीभूत !

तांत्रिक अडचणींमुळे हा पूल पूर्ण होऊ शकला नाही. पुरातत्व खातं आणि वन विभागाच्या जाचक अटींमुळे हा पूल अपुराच राहिलाय

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2018 05:51 PM IST

कोल्हापूर दुर्घटना : अर्धवट पूल 13 जणांच्या मृत्यूला कारणीभूत !

27 जानेवारी : कोल्हापूरमध्ये मिनी ट्रॅव्हल पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा जलसमाधी मिळाली. या अपघाताचं मुख्य कारण आहे पर्यायी पुलाचं अपूर्ण बांधकाम...अपूर्ण राहिल्या पुलामुळेच हा अपघात घडला अशी बाब आता समोर आलीये. खुद्द बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा पूल अर्धवट होता अशी कबुली दिली.

दोन वर्षांपूर्वी सावित्री नदीवर पुल कोसळून 24 जणांना जलसमाधी मिळाली. सावित्री नदीवरचा पूल हा कोसळण्याच्या परिस्थितीत होता त्यामुळेच ही दुर्घटना घडली होती. कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा एक पूल 13 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय. कोल्हापूरजवळच असलेल्या शिवाजी पुलावर मिनी बस जोरदार कठड्याला धडकली आणि त्यानंतर थेट पंचगंगा नदीत कोसळली. यात 13 जणांना मृत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बस जेव्हा शिवाजी पूलावरून जात होती तेव्हा समोरून एक कार आणि दुचाकी आली. त्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्नात पुलाच्या कठड्याला धडक दिली. अंधार असल्यामुळे आणि कठड्याला रंग नसल्यामुळे ड्रायव्हरला तो दिसला नाही. त्यावेळी मिनी बसचा वेग जास्त नव्हता. फक्त कठडा खचलेला होता त्यामुळे मिनी बस पलटी झाली आणि नदीत कोसळली.

दरम्यान, शिवाजी पुलाला लागूनच पर्यायी पुलाचं बांधकाम 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलंय. त्यानंतर हा पूल पूर्ण होईल अशी अपेक्षा कोल्हापूरकरांना होती. पण तांत्रिक अडचणींमुळे हा पूल पूर्ण होऊ शकला नाही. पुरातत्व खातं आणि वन विभागाच्या जाचक अटींमुळे हा पूल अपुराच राहिलाय. त्यामुळे 137 वर्ष जुना असलेल्या शिवाजी पुलावरून सध्याची वाहतूक सुरू आहे.

'शिवाजी पूल अर्धवटच'

अनेक वर्षांपासून शिवाजी पूल हा अर्धवट राहिलेला आहे. राज्यातील तिन्ही खासदारांनी यासाठी प्रयत्न केले पण त्याला काही यश आले नाही. लोकसभेत पूल दुरुस्तीचं विधेयक पास झालंय. पण राज्यसभेत हे विधेयक अडकलंय. जोपर्यंत हे विधेयक पास होत नाही त्याला कायद्याचं रूप येणार नाही. या विधेयकामुळे शिवाजी पूलच नाहीतर देशभरातील अनेक पुलांची काम सुटणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2018 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close