राज्याचा १२वी निकाल ८८.४१ टक्के, कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 30, 2018 12:15 PM IST

राज्याचा १२वी निकाल ८८.४१ टक्के, कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी

पुणे, 30 मे :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली.

नेहमीप्रमाणे यावेळीही कोकण विभागानं बाजी मारलीय. निकालात पुन्हा मुलीच अव्वल आहे.  मुलींचा निकाल 92.36 टक्के, तर मुलांचा निकाल 85.23 टक्के लागलाय. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 91.78 टक्के लागलाय.

विभागनिहाय निकाल

पुणे 89.58

नागपूर 87.57

Loading...

औरंगाबाद 88.74

मुंबई 87.44

कोल्हापूर 91.00

अमरावती 88.08

नाशिक 86.13

लातूर 88.31

कोकण 94.85

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2018 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...