उन्हाचा त्रास होतोय म्हणून कारमध्ये बसलेल्या 12 वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू

मान्सून वेशीवर आला असला तरी विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा त्रास होतोय म्हणून कारमध्ये बसलेल्या 12 वर्षीस मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 07:00 PM IST

उन्हाचा त्रास होतोय म्हणून कारमध्ये बसलेल्या 12 वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू

कुंदन जाधव (प्रतिनिधी)

अकोला, 5 जून- मान्सून वेशीवर आला असला तरी विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा त्रास होतोय म्हणून कारमध्ये बसलेल्या 12 वर्षीस मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातील देवरीफाटा नजीकच्या आलेवाडी येथे 4 जूनला रात्री उघडकीस आली. तानेश विष्णु बल्लाळ असे मृत मुलाचे नाव आहे.

तानेश हा कचरा, प्लॅस्टिक पिशव्या वेचण्याचे काम करतो. तो त्याच्या आजीसोबत आलेवाडीत आला होता. दहीहांडा पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या आलेवाडी येथे काटेरी झुडपात एमएच 43 एन 9911 क्रमांकाची ओपेरा कार उभी होती. दुपारी उन्हाचा त्रास होत असल्याने तानेश अण्णाभाऊ साठे नगरात उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडून आत बसला. परंतु कारचे दरवाजे आतून लॉक झाल्याने तानेशचा गूदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

तानेश हा आजी व मावशीसोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याकरीता आलेवाडी गावात आला होता. कचरा वेचल्यानंतर आजी तन्नेशला शोधू लागली. पण तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे आजी व तनेशच्या पालकांनी जाऊन पोलिसात तन्नेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता एका बंद पडलेल्या कारमध्ये तन्नेशचा मृतदेह त्यांना आढळला. दुपारी खूपच ऊन असल्याने या कारमध्ये बसण्याकरीता गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारचे मालक नागेश कराळे यांनी ही गाडी दोन वर्षापासून बंद अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेची चौकशी व पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.


Loading...

शौचालयाच्या टाईल्सवर महात्मा गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...