संतापजनक ! 12 वर्षांच्या मुलाने केला वारंवार बलात्कार, अल्पवयीन मुलगी गर्भवती

पालघरमध्ये 12 वर्षांच्या मुलाने केला बलात्कार, पीडितेच्या आई-वडिलांची तक्रार

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 04:02 PM IST

संतापजनक ! 12 वर्षांच्या मुलाने केला वारंवार बलात्कार, अल्पवयीन मुलगी गर्भवती

पालघर, 02 मार्च : पालघर जिल्ह्यामध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची कथित स्वरुपातील माहिती समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी एका 12 वर्षांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि संशयित आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. संशयित आरोपीकडून मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार सुरू होते, अशी तक्रार पीडितेच्या पालकांनी केली.

काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर पालक तातडीने मुलीला घेऊन डॉक्टरांकडे पोहोचले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. ही बाब डॉक्टरांनी सांगताच मुलीच्या पालकांना जबर धक्का बसला.

याबाबत आई-वडिलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिनं घडला प्रकार त्यांच्यासमोर मांडला. तिनं जे काही सांगितले, त्यानुसार पालकांनी शेजारी राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी मुलाविरोधात आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र मुलाला अद्याप अटक करण्यात आलेले नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...