News18 Lokmat

12वीचा निकाल जाहीर, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचीच बाजी

कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 30, 2017 03:29 PM IST

12वीचा निकाल जाहीर, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचीच बाजी

30 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीचा निकाल आज अखेर जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

यंदा राज्याच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 89.50 इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 2.90 टक्क्यांनी वाढ झाली.

कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे विभागाचा निकाल 91.16 टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल वेबसाईटवर पाहता येणार आहे. तर विद्यार्थ्यांना 9 जूनला दुपारी तीन वाजल्यानंतर त्यांच्या महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. मार्कांच्या पुन्हा पडताळणीसाठी 31 मे ते 9 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

विभागवार निकाल :

Loading...

कोकण - 95.20 % (सर्वात जास्त निकाल )

मुंबई - 88.21 % (सर्वात कमी निकाल)

पुणे - 91.16%

नागपूर - 89.05%

औरंगाबाद- 89.83%

मुंबई- 88.21%

कोल्हापूर- 91.40%

अमरावती- 89.12%

नाशिक- 88.22%

लातूर- 88.22%

(गेल्या वर्षीपेक्षा 2.09 टक्के जास्त निकाल)

एकूण निकाल-  89.50%

उत्तीर्ण मुले- 86.65 %

उत्तीर्ण मुली- 93.05 %

विज्ञान शाखा - 95.84%

कला- 81.91 %

वाणिज्य- 90.57 %

व्होकेशनल- 89.50%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2017 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...