पुण्यात अकरावीची पहिली यादी जाहीर, मुंबईत मात्र, बोजवारा

अकरावीच्या या पहिल्या कटऑफ यादीत 48 हजार324 जणांना प्रवेश देण्यात आलाय. यापैकी 19 हजार 991 मुलांना पहिला पसंतीक्रम मिळालाय. मुंबईत मात्र, तांत्रिक अडचणींमुळे यादी प्रसिद्ध होण्यात अडचणी

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2017 08:11 PM IST

पुण्यात अकरावीची पहिली यादी जाहीर, मुंबईत मात्र, बोजवारा

 

10 जुलै: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता जाहीर झाली. अकरावीच्या या पहिल्या कटऑफ यादीत 48 हजार324 जणांना प्रवेश देण्यात आलाय. यापैकी 19 हजार 991 मुलांना पहिला पसंतीक्रम मिळालाय. अकरावी प्रवेशासाठी एकूण 78 हजार 438 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिला पसंती क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं बंधनकारक आहे, त्यांना शाखा बदलण्याची संधी मात्र दुसऱ्या फेरीत मिळणार आहे. प्रवेश न घेतल्यास ते विद्यार्थी बाहेर पडतील. दुसरा पसंती क्रमांक मिळालेले विद्यार्थी नव्याने पसंतीक्रम भरू शकतील.

मुंबईत मात्र, अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश यादीचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्रं बघायला मिळालं. तांत्रिक अडचणींमुळे संध्याकाळी 5 वाजता मुंबईतली यादी प्रसिद्ध करता आली नाही. त्यामुळे पुन्हा सात वाजता यादी जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण सात वाजता वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा करावा लागतोय.

पुण्यातील अकरावीची पहिली गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे -

कला शाखा

Loading...

५ हजार ८११(मराठी)

२ हजार २९०(इंग्रजी)

वाणिज्य (मराठी)

१२ हजार ९६८

वाणिज्य (इंग्लिश)

२२ हजार ३९७

विज्ञान शाखा

३३ हजार ४५९

एकूण अर्ज ७८ हजार ४३८ अर्ज

पहिल्या यादीत २९ % विद्यार्थ्यांना ( विद्यार्थी संख्या- १९ हजार ९९१) पहिल्या पसंतीक्रमाचं कॉलेज मिळाले.

पहिल्या फेरीत एकूण ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 08:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...