10 वी व 12 वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

10 वी व 12 वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे.

  • Share this:

पुणे, 12 जून- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे.

10 वीची लेखी परीक्षा 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान तर 12 वीची लेखी परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान तसेच 12 वीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 17 जुलै ते 31 जुलै दरम्यान होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

10 वीच्या स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार

यंदी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा 10 वी निकाल कमी लागला त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली. यावर्षीच्या निकालात शाळांनी दिलेले अंतर्गत गुण ग्राह्य धरले नसल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलं. या निकालामुळे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी मागे पडतील अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती. ही चिंता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी बोलणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केलं.

अकारावीच्या प्रवेशासाठी CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परिक्षेचेच गुण ग्राह्य धरले जावेत यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचंही तावडे यांनी जाहीर केलं. एकूण निकाल लावताना CBSE आणि ICSEच्या मुलांचे शाळांनी अंतर्गत परिक्षेत दिलेले काही गुण ग्राह्य धरले जातात. स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा नाही. त्यामुळे त्यांच्या निकालाची टक्केवारी एकदम खाली घसरली.

अंतर्गत गुणांमुळे निकालाची टक्केवारी वाढते. शाळा आपल्या मुलांना गुण देताना सढळ हाताने गुणे देतात त्यामुळे निकालांची टक्केवारी वाढते. हे गुण देतांना योग्य निकष लावले जात नाही असं आढळून आल्याने राज्य सरकारने ते गुण ग्राह्य धरणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र CBSE आणि ICSEच्या मुलांना मात्र हे गुण दिले जातात. त्यांचं बोर्ड वेगळं असल्याने त्यांना हा नियम लागू होत नाही. या निर्णयचा फटका बसल्याने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

निकालांच्या तीव्र स्पर्धेत स्टेट बोर्डाची मुलं मागे पडतील अशी चिंता सर्वच स्तरांमधून व्यक्त होत होती. पालक आणि विद्यार्थ्यांनीही तीव्र चिंता व्यक्त केली होती त्या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची विनंती केंद्राने मान्य केली तर 10वीच्या लाखो विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशासाठी मोठा फायदा मिळणार आहे.

दहावीत पुन्हा मुलींनीच मारली बाजी..

महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (दिनांक 8 जून) जाहीर झाला. दरम्यान, बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे. दहावीच्या निकालातील गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रेण्ड कायम राहिला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यातील एकूण 1 हजार 794 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.

एकूण निकाल :

मुली : 82.82 टक्के

मुले : 72.18 टक्के

विभागवार निकाल

महाराष्ट्रात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.

निकालाची एकूण टक्केवारी : 77.10 टक्के

कोकण विभाग (सर्वाधिक) : 88.38 टक्के

नागपूर विभाग (सर्वात कमी): 67.27 टक्के

मुंबई विभाग : 77.04 टक्के

पुणे विभाग : 82.48 टक्के

कोल्हापूर विभाग : 86.58 टक्के

औरंगाबाद विभाग : 75.20 टक्के

नाशिक विभाग : 77.58

लातूर विभाग : 72.87

अमरावती विभाग : 71.98


CycloneVayu: बळीराजाची चिंता वाढणार, मान्सून आणखी लांबणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या