बीडमध्ये 10 वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या.. सोळाव्या वर्षीच संपवली जीवनयात्रा

घरात कोणी नसताना एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. आष्टी तालुक्यातील खिळद येथे ही घटना घडली आहे. सोळा वर्षीय आरती आजिनाथ गर्जे हिने आत्महत्येसारखं टोलचे पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकले नाही.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 08:19 PM IST

बीडमध्ये 10 वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या.. सोळाव्या वर्षीच संपवली जीवनयात्रा

बीड, 17 मे- घरात कोणी नसताना एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. आष्टी तालुक्यातील खिळद येथे ही घटना घडली आहे. सोळा वर्षीय आरती आजिनाथ गर्जे हिने आत्महत्येसारखं टोलचे पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकले नाही.

खिळद येथील आजिनाथ गर्जे हे पनवेल येथे चालक म्हणून काम करतात. खिळद येथे त्यांची पत्नी, तीन मुली राहतात. आरती ही तीन मुलींमध्ये थोरली होती. आरतीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. दुपारी आरतीची आई रुग्णालयात गेली होती. दोघी बहिणी बाहेर खेळत होत्या. या दरम्यान आरतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास सुरु आहे.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..


Loading...

राज्यात पुन्हा धडकणार उष्णतेची लाट, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...