नाशिकमध्ये जि.प शिक्षकांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघड,10 शिक्षकांवर कारवाई

योग्य नेमणूक आणि सवलतींसाठी या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केली होती. यामध्ये अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांचा ही समावेश होता.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2017 08:58 AM IST

नाशिकमध्ये जि.प शिक्षकांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघड,10 शिक्षकांवर कारवाई

नाशिक,13 डिसेंबर:  जिल्हा परिषद शिक्षकांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघड झाला आहे.  याप्रकरणी 10 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असून 5 शिक्षकांचं निलंबनही करण्यात आलं आहे.

योग्य नेमणूक आणि सवलतींसाठी या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केली होती. यामध्ये  अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांचा ही समावेश होता. ही प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रमाणित  केली आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं  तक्रार केली होती.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विशेष पथकानं त्यानंतर  चौकशी केली . तर  या चौकशीत सर्व प्रमाणपत्र बोगस अणि बनावट असल्याचं  उघड झालं.

याप्रकरणी जिल्ह्यातील 10 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली.   5 शिक्षकांना तात्काळ निलंबनाचे आदेश देण्यात आले.   तर 5 शिक्षकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जवळपास 150 शिक्षकांकडे बोगस आणी बनावट प्रमाणपत्र असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.  याशिवाय  संपुर्ण राज्यभर बोगस प्रमाणपत्र वाटप करणारं रॅकेट असल्याची माहितीही प्रशासनाला मिळाली आहे

तेव्हा आता या रॅकेटवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...