मनसे आंदोलकाला तहसीलदाराने मागितला 1 कोटीचा जामीन!

जर जाधव यांनी कायद्याचा भंग केला, तर एक कोटी रुपये या जामीनदाराकडून वसूल केले जातील. 21 ऑक्टोबर रोजी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या स्टॉल आणि सामानाची तोडफोड केली होती. त्याप्ररकरणी तेहसीलदारांनी ही नोटीस पाठवलीय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2017 02:31 PM IST

मनसे आंदोलकाला तहसीलदाराने मागितला 1 कोटीचा जामीन!

ठाणे, 07 नोव्हेंबर:  मनसेच्या ठाणे शहरअध्यक्ष अविनाश जाधवला तहसिलदाराने 1 कोटी रूपयांचा जामीनदार आणा तरच जामीन मिळेल अशी नोटीस बजावली आहे. आंदोलन चिरडण्यासाठी तब्बल 1 कोटीचा जामिन मागितल्याचा आरोप सगळीकडून करण्यात येतोय

म्हणजे, जर जाधव यांनी कायद्याचा भंग केला, तर एक कोटी रुपये या जामीनदाराकडून वसूल केले जातील. 21 ऑक्टोबर रोजी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या स्टॉल आणि सामानाची तोडफोड केली होती. त्याप्ररकरणी तेहसीलदारांनी ही नोटीस पाठवलीय.

जामीन हवा असेल तर एक कोटी रुपयांचा जामिनदार आणा. अशी नोटीस मनसे शहराध्यक्षाला बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांप्रमाणे ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनासाठी त्यांना ही नोटीस बजावण्यात आलीय. अविनाश यांच्या सह इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा २५ लाख, ५० लाख अशा स्वरुपाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

२१ ऑक्टोबरला ठाण्यातील स्टेशनजवळच्या सॅटीस ब्रीज इथल्या फेरीवाल्यांचे सामान फेकणे, दमदाटी करणे, मारहाण करून हुसकावून लावणे हे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. पण आश्चर्य म्हणजे या आरोपांसाठी त्यांना तीन वर्षासाठी १ कोटीचा जामिनदार आणायला सांगण्यात आलंय. हा जामीनदार मिळाल्याशिवाय त्यांचा जामिन होणार नाही आहे. याबाबत काही वकिलांशी चर्चा केली असता त्यांनी कारवाई नियमात होत असली तरी ती आक्षेप घेण्यासारखी असल्याचं सांगितलय. कारण अशा प्रकरणात एकुण सामानाचं जे नुकसान झालं आहे त्याचा अंदाज ही घेतला जातो. त्यामुळे ही रक्कम वाढू शकते. पण तरी ती एक कोटी झाल्याचं आजवर पाहण्यात आलं नसल्याचं सांगण्यात आलयं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप होतोय. कारण इतक्या मोठ्या रक्कमेचा जामिनदार मिळवणं कठिण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...