25 सप्टेंबर : एकीकडे महायुतीत जागावाटपावरून तणाव शिगेला पोहचला आहे. मात्र काँग्रेसनंतर आता मनसेनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 153 उमेदवारांची यादी मनसेनं जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान आमदारांबरोबर पक्षात नव्यानं प्रवेश केलेल्या काही उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मनसेच्या सर्व विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. माहिममधून नितीन सरदेसाई, मागाठणे प्रवीण दरेकर, विक्रोळी मंगेश सांगळे, भांडूप पश्चिममधून शिषीर शिंदे, मुलंुडमधून सत्यवान दळवी, बोरीवलीतून नयन कदम यांना तिकीट देण्यात आलंय. तर राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे घाटकोपरच्या रिक्त जागेवर दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अशी आहे मनसेची यादी
माहिम - नितीन सरदेसाई
मागाठणे - प्रवीण दरेकर
विक्रोळी- मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम- शिषीर शिंदे
मुलुंड - सत्यवान दळवी
बोरीवली - नयन कदम
घाटकोपर पश्चिम - दिलीप लांडे
चांदिवली - ईश्वर तायडे
कुर्ला - स्नेहल जाधव
मुंबादेवी - इम्तियाज अमिन
ंजोगेश्वरी पूर्व - इम्तियाज अमिन
दिंडोशी - शालिनी ठाकरे
पनवेल - केसरी पाटील
भायखळा - संजय नाईक
मलबार हिल - राजेंद्र शिरोडकर
गुलाबसिंग वसावे - नंदुरबार
महादेव वसावे - नवापूर
धुळे ग्रामीण - अजय माळी
रावेर - जुगल पाटील
भुसावळ - रामदास सावकारे
जळगाव शहर - ललित कोल्हे
येरंडूल - नरेंद्र पाटील
चाळीसगाव - राकेश जाधव
पाचोरा - दिलीप पाटील
बुलडाणा - संजय गायकवाड
चिखली - विनोद खरपास
सिंदखेडराजा - विनोद वाघ
जळगाव-जामोद - गजानन वाघ
अकोट - प्रदिप गावंडे
अकोला पश्चिम - पंकज साबळे
मूर्तीजापूर - रामा उंबरकर
बल्लारपूर - हर्षल चिपळूणकर
चिमूर - अरविंद चांदेकर
वरोरा - अनिल मुजोने
वणी - राजू उंबरकर
उमरखेड - मारोजी फुंकलवाड
किनवट - धनलाल पवार
भोकर - माधव जाधव
नांदेड उत्तर - दिलीप ठाकूर
नांदेड दक्षिण - प्रकाश मारावार
लोहा - रोहिदास चव्हाण
देगलूर - सूर्यवंशी इरबा
कळमनुरी - सुनील अडकिणे
हिंगोली - ओमप्रकाश कोटकर
जिंतूर - खंडेराव आघाव
गंगाखेड - बालाजी देसाई
पाथरी - हरिभाऊ लहाने
कर्जत - जे.पी. पाटील
उरण - अतुल भगत
पेण - गोवर्धन पोलसानी
महाड - सुरेंद्र चव्हाण
जुन्नर - शरद सोनावणे
खेड (आळंदी) - समीर ठिगळे
शिरुर - संदीप भोवंडे
दौंड - राजाभाऊ तांबे
पुरंदर - बाबा जाधवराव
भोर - संतोष दसवडकर
चिंचवड - अनंत कोराळे
कोथरूड - किशोर शिंदे
खडकवासला - राजाभाऊ लायगुडे
पर्वती - जयराज लांडगे
हडपसर - नाना भालगिरे
पुणे कॉन्टॉन्मेंट - अजय तायडे
कसबा पेठ - रवींद्र धंगेकर
कल्याण पश्चिम- प्रकाश भोईर
शहापूर- ज्ञानेश्वर तळपदे
अंबरनाथ- विकास कांबळी
कल्याण पूर्व- नितीन कदम
भिवंडी ग्रामीण- दशरथ पाटील
नालासोपारा- विजय मांडवकर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, MNS, Pravin darekar