महायुतीत तणाव शिगेला

BJP And Shivsena

19 सप्टेंबर : युतीतील तणाव वाढला असून शुक्रवारीही दोन्ही पक्षांमधील बेबनाव कायम राहिला आहे. गुरुवारी 12 तासांचा अल्टिमेटम देणारे भाजप नेते आता आणखी दोन दिवस वाट बघणार आहे. या दोन दिवसांत शिवसेनेने प्रतिसाद न दिल्यास तीन दिवसांनी भाजपची पहिली यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 130 जागा लढवण्याचा प्रस्ताव शिवसेनेसमोर मांडला आहे. तर शिवसेनेने भाजपला 119 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामधून मित्रपक्षांनाही जागा द्या असे शिवसेने म्हणणे आहे. तर भाजप 130 जागांवर ठाम असून त्यांनी शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. निवडणूक महिनाभरावर आली असतानाच युतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसून दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवरी भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक होणार आहे. शिवसेना - भाजपमध्ये यापूर्वीही तणाव होते. पण ते इतके शिगेला पोहोचतील असे कधीच वाटले नव्हते. हे सर्व अत्यंत दुदैर्वी आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. गडकरींच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होईल अशी माहितीही खडसे यांनी दिली.

दरम्यान, महायुती टिकवण्यासाठी मित्रपक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला 120, शिवसेनेला 150 तर मित्रपक्षांना 18 जागा द्याव्यात असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मांडला आहे. महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा आमचा आग्रह असल्याचेही त्यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखातीमध्ये स्पष्ट केले.तर दुसरीकडे महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षानंही संध्याकाळी 4 वाजता बैठक बोलावली, यात सर्व जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, Shivsena, Udhav thakare, उद्धव ठाकरे, जागावाटप, भाजप, महायुती, महायुतीची बैठक, शिवसेना