अॅपच्या माध्यमातून खाद्य विकणाऱ्यांना सरकारकडून वेसन

अॅपच्या माध्यमातून खाद्य विकणाऱ्यांना सरकारकडून वेसन

बृहन्मुंबई विभागात तब्ब्ल ११३ आस्थापना अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचं दिसून आलंय.

  • Share this:

पुणे, 10 आॅक्टोबर : अॅपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ११३ कंपन्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. या कंपन्यांना प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या कंपन्यांशी संलग्न आहेत. अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

बापट म्हणाले की, ई कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरूवात झाली आहे. अॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून या कंपन्या शासनाची परवानगी न घेता खाद्य पदार्थ पुरवत होत्या. यातील काही कंपन्या पदार्थांचा ताजेपणा जपत नव्हत्या. भेसळयुक्त पदार्थ विकत होत्या. असे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली.

बृहन्मुंबई विभागात तब्ब्ल ११३ आस्थापना अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचं दिसून आलंय. यातल्या अनेक कंपन्या घरपोच सेवा देत होत्या. तसंच त्यांनी खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण आणि परवाने घेतले नसल्याचं तपासणीमध्ये आढळून आलंय. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात ही कारवाई करण्यात आली.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे आणि अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ३४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११३ ठिकाणी नोंदणी न करताच खाद्यपदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले अशी माहिती बापट यांनी दिली.

स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या अॅपच्या माध्यमातून हा गैरव्यवहार होत होता. स्विगी अॅपच्या माध्यमातून ८५ विक्रेते इ सेवा देत होते. तर झोमॅटो अॅपच्या माध्यमातून ५० विक्रेते घरपोच पदार्थ देत होते. फुडपांडा आणि उबर इट्स या अॅपच्या माध्यमातून अनुक्रमे ३ व २ विक्रेते खाद्यपदार्थ देत होते. या सर्वांना आज नोटीसा देण्यात आल्या. पुढील आठवड्यात त्यांच्यावर व्यवसाय बंदीची कारवाई केली जाईल.

=======================================================

First published: October 10, 2018, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading