कोल्हापूरच्या अंबाबाईसमोर झहीर-सागरिका नतमस्तक

कोल्हापूरच्या अंबाबाईसमोर झहीर-सागरिका नतमस्तक

कोल्हापूरच्या या सागरिकानं आणि झहीर खान यांनी काल रात्री उशिरा करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं.

  • Share this:

02 डिसेंबर : मूळची कोल्हापूरची, चक दे गर्ल फेम सागरिका घाटगे आणि भारताचा माजी गोलंदाज झहीर खान यांचा नुकताच विवाह झाला. त्यानंतर कोल्हापूरच्या या सागरिकानं आणि झहीर खान यांनी काल रात्री उशिरा करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं.

लग्न झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्य अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येतात. सागरिकाच्या घरी तशी परंपरा आहे. तशाच पद्धतीनं सागरिका आणि झहीर खान यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं.देवस्थान समितीनं यावेळी दोघांचंही स्वागत केलं. दोघांना पाहायला लोकांनी गर्दी केली होती.

सागरिका ही अभिनेत्री होण्याआधी राजकुमारी आहे. याविषयी एका मुलाखतीत सागरिका म्हणालेली की, ‘होय, मी राजकुमारी आहे. कोल्हापूरमधील घराण्याशी माझे नाते आहे. अशा राजघराण्यात जन्माला आल्याने मी स्वतःला नशीबवान समजते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आमच्या घराण्याच्या इभ्रतीला धक्का पोहचणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेते. मी कोल्हापूरची असले तरी माझे बालपण मुंबईतच गेले. त्यानंतर मी बोर्डिंगमध्ये शिकण्यासाठी गेले, असे सागरिकाने सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading