मुंब्रेश्वराच्या महाप्रसादात विष कालवण्याचा कट उघड.. 40 हजार भाविक होते मंदिरात

'दाईश' या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहा दहशतवाद्यांच्या विरोधात दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी आरोपपत्र दाखल केले. या दहशतवाद्यांनी मुंब्रेश्वराच्या मंदिरातील महाप्रसादात विष कालवण्याचा कट आखला होता...

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 05:52 PM IST

मुंब्रेश्वराच्या महाप्रसादात विष कालवण्याचा कट उघड.. 40 हजार भाविक होते मंदिरात

मुंबई, 25 जुलै-'दाईश' या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहा दहशतवाद्यांच्या विरोधात दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी आरोपपत्र दाखल केले. या दहशतवाद्यांनी मुंब्रेश्वराच्या मंदिरातील महाप्रसादात विष कालवण्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक माहिती त्यातून समोर आली आहे. एटीएस या सगळ्यांना मुंब्रा आणि औरंगाबादेतून जानेवारी महिन्यात अटक केली होती. या सर्वांचा दाईश या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. दाईश ही संस्था वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याशी संबंधित असल्याचा संशय एटीएसला आहे.

मंदिरात भाविक मोठ्याप्रमाणावर आल्याने कट फसला..

मिळालेली माहिती अशी की, 400 वर्षे जुन्या मुंब्रेश्वर मंदिरात डिसेंबर महिन्यात श्रीमद भागवद् कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाप्रसादात विष कालवण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता. मात्र, त्यादिवशी मंदिरात 40 हजारांहून जास्त भाविक आल्याने त्यांचा हा कट फसला, अशी कबुली त्यांनी दिली आहे. तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिक हा या कटाचा मुख्य सूत्रधार होता.

स्फोटाचे प्रात्यक्षिकही दाखवले..

मुंब्रा बायपास रोडच्या परिसरात सर्व दहशतवाद्यांनी टोळक्याचा म्होरक्या अबू हमजा याने स्फोटाचे प्रात्यक्षिकही दाखवले होते. या कटात मोहसीन खान उर्फ अबू मोर्या, अताई वारीस अब्दूल रशीद शेख उर्फ मझहर शेख, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, जम्मन खुठेऊपाड उर्फ अबू किताई, सलमान खान उर्फ अबू उबेदा आणि फरहाद अन्सारी यांचा हात असल्याचे एटीएसने म्हटले आहे.

Loading...

VIDEO : लग्न एकदाच होतं, 'जन्म जन्म का साथ' असं काही नसतं, ओवेसींची लोकसभेत फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...