सोलापूर, 9 ऑक्टोबर : राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेचे धनुष्यबाणचिन्ह हे गोठवण्यात आलं. यानंतर ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या संतप्त शिवसैनिकांनी चक्क बंडखोर आमदारांची आणि निवडणूक आयोगाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अकलूजच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. आणि 'गद्दारांमुळेच धनुष्यबाण चिन्ह गेलं', अशी टीका आंदोलकांनी केली. धनुष्यबाणावर अधिकार हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शनिवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्यात आलं. यानंतर राज्यातील सत्ता समीकरणांना आणि राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये मोठे बदल होण्यास सुरुवात झाली. अशातच अकलूज या ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी चक्क बंडखोर आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत स्मशानभूमीत जाऊन त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे अंत्यसंस्कार केले. यावेळी आमदारांविरुद्ध आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी झाली. व्यंगचित्राच्या माध्यमातून 'मोदी-फडणवीस यांच्या हातचा निवडणूक आयोग हे बाबुराव झाले' असल्याचं लिहिलेलं पोस्टर देखील यावेळी युवा सैनिकांनी प्रकाशित केले.
— News18Lokmat (@News18lokmat) October 9, 2022
(उद्धव ठाकरे आज 6 वाजता जनतेशी साधणार संवाद)
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यातूनच अकलूज येथील शिवसैनिकांनी संबंधित कृती केली. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय अधिक संतापजनक असल्याचे आंदोलक कार्यकर्त्यांनी म्हटलं. दरम्यान, या पुढच्या काळात शिवसेनेचे आणि ठाकरे गटाच्या चिन्हाचे अस्तित्व काय असनार? याबाबत विविध चर्चा सुरु आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election commission, Shiv sena, Solapur