प्रेमप्रकरणामुळे औरंगाबादेत तरुणाचं मुंडकं तलवारीनं छाटून धडापासून केलं वेगळं

प्रेमप्रकरणामुळे औरंगाबादेत तरुणाचं मुंडकं तलवारीनं छाटून धडापासून केलं वेगळं

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका तरुणाचं मुंडके तलवारीने छाटून धडापासून वेगळं केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद,16 मार्च:औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका तरुणाचं मुंडके तलवारीने छाटून धडापासून वेगळं केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाल्याचं बोललं जात आहे. लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे ही थरारक घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणीचे वडील आणि चुलत्याने त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केला. यात तरुणाच्या अल्पवयीन धाकट्या भावाचं तलवारीनं मुंडकं धडापासून वेगळे करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय-17) असे मृत तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यात भीमराज याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा....तर घरात बोभाटा करीन; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं 15 वर्षीय दीराला केलं मजबूर

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही आरोपींनी अटक केली आहे. बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल गायकवाड (वय-22) हा 12 मार्चपासून बेपत्ता आहे. शेजारील देवकर वस्तीवरील देविदास छगन देवकर याची 24 वर्षीय मुलगीही बेपत्ता आहे. अमोल यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबियांना आहे. त्यामुळे त्यांनी सूडभावनेतून ही हत्या केली आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

हेही वाचा..धक्कादायक! प्रेयसीला खूश करण्यासाठी त्यानं 6 महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

विवाहितेचं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा

दरम्यान, अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पिता-पुत्राने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यात समोर आली होती. माढा तालुक्यातील लऊळ गावात ही घटना घडली . राजाराम घुगे असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. राजाराम याने घरातील महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध ठेवले. त्यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपी खंडू गोरे आणि संतोष गोरे या पिता-पुत्राने दिली आहे. या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुर्डुवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाराम घुगे हा मुळचा लऊळ गावचा रहिवासी होता. मात्र, नोकरीनिमित्त तो पुण्यात होता. पुण्यात पिझ्झा डिलिव्हरीचं काम करत होता. परंतु लऊळ गावातील गोरे कुटुंबीयांतील एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. यापूर्वी गोरे कुटुंबातील पिता-पुत्राने त्याला बजावलं होतं. मात्र राजारामने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याचा खात्मा केल्याची कबुली आरोपी पितापुत्राने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2020 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading