मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

VIRAL VIDEO: आधी तरुणाला झाडाला बांधलं आणि त्यानंतर आरोपींनी त्याच्यासोबत...

VIRAL VIDEO: आधी तरुणाला झाडाला बांधलं आणि त्यानंतर आरोपींनी त्याच्यासोबत...

Youth tied to tree and beaten, video goes viral: सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे.

जळगाव, 11 डिसेंबर : एका तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण (Youth tied to tree and beaten) करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (youth beaten video goes viral in social media) होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र, हा व्हिडीओ जळगावातील असल्याचं बोललं जात आहे. एका गुन्ह्यातील जामीनावर असलेल्या तरुणाने दुसऱ्या एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार व्हिडीओतून समोर आला आहे. (Youth tied to tree and beaten video viral in social media) भरदिवसा तरुणांच्या घोळक्यात या तरुणाला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ जळगावात सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर व्हिडीओ हा जळगावातील असल्याचा दावा व्हायरल मेसेज मधून केला जात आहे. आपल्या टोळीतील सदस्याला चौघांनी मारहाण केल्याचा बदला म्हणून एका गुन्ह्यातील जामीनावर असलेल्या तरुणाने दुसऱ्या तरूणाला झाडाला बांधून मारहाण केल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. जळगावात यापुढेही गॅंगवॉर सारखे गुन्हे समोर आले आहेत, त्यातच आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडीओमधून पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाचा : फावडं डोक्यात घालून पाडला रक्ताचा सडा, कोल्हापुरात मुलाकडून बापाची निर्घृण हत्या कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाला झाडाला बांधले काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या अंजनविहिरे (Anjanvihire) येथे एक संतापजनक प्रकार घडला होता. एका अल्पवयीन मुलाने झाडावरील कैऱ्या तोडल्याच्या रागातून त्याला झाडाला बांधण्यात आले होते. इतकेच नाहीतर त्याला बेदम मारहाण करुन त्याच्या अंगावर लघुशंका करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोपी पीडित मुलाने केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अंजनविहिरे येथे शेतातील कैर्‍या तोडल्याच्या कारणावरून शेतमालकासह रखवालदाराने एका अल्पवयीन मुलाला दोन तास झाडाला बांधून ठेवले. या मुलाचा मोबाइलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेतमालक गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील आणि रखवालदार प्रवीण पावर्‍या (दोघे रा.अंजनविहिरे, ता.भडगाव) यांना अटक केली होती.
First published:

Tags: Crime, Jalgaon, Viral videos

पुढील बातम्या