Home /News /maharashtra /

बापरे! कोविड सेंटरमागे 'त्याने' सोडले 25 ते 30 साप; रुग्णांमध्ये एकच खळबळ

बापरे! कोविड सेंटरमागे 'त्याने' सोडले 25 ते 30 साप; रुग्णांमध्ये एकच खळबळ

एका तरुणाने 25 ते 30 साप कोविड केअर सेंटरच्या मागे सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    राहुल खंदारे, बुलडाणा प्रतिनिधी बुलडाणा, 1 मे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यात सुरू असल्याने बाधितांना रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मात्र, असे असताना आता एक विचित्र घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील (Buldhana District) मलकापूर येथील उप जिल्हा रुग्णालयाच्या (Malkapur hospital) परिसरात असलेल्या कोविड सेंटरच्या (Covid Ceneter)मागे एका व्यक्तीने चक्क 25 ते 30 साप (Snakes) सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाने असं करण्यामागे काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेले नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील उप जिल्हा रुग्णालयाच्या परिसराच्या मागील बाजुला कोविड केअर सेंटर आहे. या परिसरात एका तरुणाने 25 ते 30 साप सोडल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे साप सोडणारा हा व्यक्ती एक सर्पमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. या 25 ते 30 सापांपैकी काही साप हे जिवंत होते तर काही साप मृतावस्थेत होते. वाचा: नाशिकमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन? रुग्णांमध्ये दिसून आली वेगळीच लक्षणे रुग्णालयातील सफाई कर्मचारी दीपक घुसर याने सांगितले की, आम्ही नेहमीप्रमाणे साफसफाई करत होतो त्यावेळी आम्हाला साप दिसून आला. त्यानंतर तेथेच आणखी काही साप आढळून आले. आम्ही आजुबाजुला पाहिले असता एक अक्रम नावाचा तरुण येथे साप सोडत असल्याचं निदर्शनास आलं. आम्ही त्याला समजावले मात्र, तो ऐकत नाही. त्याने एका पिशवीत साप आणले आणि येथे सोडले. त्यापैकी काही साप हे जिवंत होते तर काही साप मृतावस्थेत होते. याने हे पहिल्यांदाच केलेले नाहीये तर यापूर्वीही त्याने अनेकदा असे केले आहे. त्याने या ठिकाणी सोडलेल्या सापांमध्ये कोब्रा, धामण यासारखे साप होते. जे साप मृतावस्थेत होते त्यांना आम्ही जवळच एका शेतात गाडले असंहे सफाई कर्मचारी दीपक घुसर याने सांगितले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Buldhana news, Coronavirus, Snake

    पुढील बातम्या