शिर्डी, 24 मे: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. यात श्रीरामपूरमध्ये थरार पाहायला मिळाला आहे. श्रीरामपूर शहरातील अशोक नगर परिसरात असलेल्या जोशी वस्तीवर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्या आली आहे. गणेश साळवे (वय 28 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव असून जमिनीच्या वादातून त्याची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा...मठापतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या
मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री ही घटना घडली. जागेच्या वादातून आरोपी राजू गांगुर्डे हा त्याच्यासोबत आलेल्या 25 ते 30 जणांना घेऊन गणेश साळवे याच्या घरी आला. जागेच्या वादातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं आणि आरोपींनी गणेश साळवे यास बेदम मारहाण केली. राजू गांगूर्डे याने आपल्याकडील पिस्तूलमधून गणेश साळवेवर याच्या छातीत गोळी घातली. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मुख्य आरोपी राजू गांगुर्डे आपल्या साथीदारांसह फरार झाला आहे.
या घटनेनंतर जोशी वस्ती येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी धाव घेतली. त्यानंतर डीवायएसपी राहुल मदने हे देखील घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या शोधा करता पोलिस रवाना झाले असून अजूनही गुन्हा दाखल झाला नाही.
हेही वाचा......तर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल - संजय राऊत
दरम्यान मयत गणेश याचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर त्याठिकाणी रात्री मोठा जमाव जमा झाला होता. यावेळी दवाखाना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.