Home /News /maharashtra /

Jalgaon Crime : एकतर्फी प्रेमातून नवविवाहितेला चाकूचा धाक दाखवून डाबलं अन्..

Jalgaon Crime : एकतर्फी प्रेमातून नवविवाहितेला चाकूचा धाक दाखवून डाबलं अन्..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पीडिता ही 12 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंपकडून (Gujral Petrol Pump) घरी जात होती. यावेळी तिथे निखिल सोनवणे हा तरुण दुचाकीवर आला. त्याने पीडितेचा रस्ता अडवला तसेच म्हणाला की, तु माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणत त्याने तिला चाकूचा धाक दाखवला.

पुढे वाचा ...
    जळगाव, 22 मे : दिवसेंदिवस एकतर्फी प्रेमाच्या (One Side Love) बातम्या पाहायला मिळत आहे. अनेकदा या एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर हल्ला (Attack on Girlfriend in One Side Love) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इतकेच नाही तर या एकतर्फी प्रेमातून प्रेयसीचा खूनसुद्धा (Girlfriend Murder) केल्याचे तुम्ही वाचले आहे. आता महाराष्ट्राच्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं? एका नवविवाहितेला डांबल्याचा (Newly Married Woman Locked in House) प्रकार समोर आला आहे. निखिल वना सोनवणे, असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका नवविवाहित तरुणीला भररस्त्यावर गाठले. तसेच 'तु माझी नाही झाली तर कुणाचीच होऊ देणार नाही', असे तो तिला म्हणाला. तसेच यानंतर चाकूचा धाक दाखवत दुचाकीवर बसवून त्याच्या मावशीच्या घरी घेऊन गेला. तसेच शिवाजी नगरमध्ये (Shivaji Nagar Jalgaon) असलेल्या या त्याच्या मावशीच्या घरी त्याने तिला डांबून ठेवले. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणाने अडवला पीडितेचा रस्ता आणि...  याप्रकरणी फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार माहिती अशी की, पीडिता ही 12 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंपकडून (Gujral Petrol Pump) घरी जात होती. यावेळी तिथे निखिल सोनवणे हा तरुण दुचाकीवर आला. त्याने पीडितेचा रस्ता अडवला तसेच म्हणाला की, 'तु माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होऊ देणार नाही', असे म्हणत त्याने तिला चाकूचा धाक दाखवला. इतकेच नव्हे तर चाकूचा धाक दाखवून तिला बळजबरीने दुचाकीवर बसायला सांगितले. हेही वाचा - Nashik Murder : भिशीचे पैसे भरण्यावरुन वाद, पत्नीने पतीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव यानंतर त्याने तिच्या हातातील मोबाईल जप्त करुन घेतला आणि शिवाजी नगर येथे घेऊन जाऊन त्याच्या मावशीच्या घरी एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर पुन्हा गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घराच्या संरक्षक भिंतीवरुन त्याने उडी घेतली. तसेच आतमध्ये काचेची बाटली घेऊन आला आणि पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, याप्रकरणी आरोपी निखिल वना सोनवणे याला पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या