आधी मुलीची छेड काढली नंतर घरात घुसून वडिल आणि भावावर केला चाकूहल्ला!

आधी मुलीची छेड काढली नंतर घरात घुसून वडिल आणि भावावर केला चाकूहल्ला!

एखाद्या सिनेमात घडावी अशी गुंडगिरीची घटना वसईत घडली आहे.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई, 23 फेब्रुवारी : वसईमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच एखाद्या सिनेमात घडावी अशी गुंडगिरीची घटना वसईत घडली आहे. तरुणीला छेड काढणाऱ्या गुंडाने घरातून घुसून तिच्या भाऊ आणि आईवर चाकूने हल्ला केल्याची घटना वसई पूर्वेकडील वसई फाटा इथं घडली.  याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वसईतील पूर्व भागात राहणाऱ्या सिंग कुटुबीयांचं गेल्या वर्षभरापासून आरोपी पिंकू दुबे नावाच्या तरुणाने जगण मुश्कील केलं आहे. सिंग यांची मुलीची तो गेल्या वर्षभरापासून छेड काढतोय. दरम्यान, सिंग यांची मुलगी मेडिकलच्या दुकानात गेली असता तिला वाटेत अडवून हात पकडून लगट केली असता तिने वडिलांना सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पिंकूने सिंग यांच्या घरात घुसून पीडित मुलीला आणि मुलीच्या वडिलांना दांड्याने मारहाण केली. बहिणी आणि वडिलांना मारहाण करताना पाहून भावाने सोडवण्यासाठी प्रतिकार केला असता त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आला. त्यानंतर आरोपी घरात पसार झाला.

या प्रकरणी सिंग कुटुंबाने वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.  पोलिसांनी सिंग कुटुंबातील जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.  अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस पुढील तपास करत आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून, मृतदेह शेतात नेऊन जाळला

दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर मारेकरी पतीने पत्नीचा मृतदेह शेतात नेऊन पेट्रोल टाकून जाळल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली आहे. छाया लेंडे असं मृत महिलेचं नाव आहे.

सुनील लेंडे असे आरोपी पतीचे नाव असून तो स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह शेतात पेट्रोल टाकून जाळल्याची कबुलीही त्याने दिली आहे. आरोपी पतीविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण..?

आरोपी सुनील लेंडे हा पत्नीच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. शनिवारी संध्याकाळी आरोपीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यात छायाचा जागेवरच मृत्यू झाला. रात्री पत्नीच्या मृतदेहावर पोते व पेट्रोल टाकून शेतापासून काही अंतरावर जाळला. त्यानंतर आरोपी घरी आला. पत्नीच्या नातेवाइकाचे निधन झाले असून ती माहेरी गेली असल्याचे त्याने आई-वडिलांना सांगितले. त्याच्या मुलांना आई-वडिलांसोबत पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. नंतर मात्र सकाळी उठून त्याचे स्वतःहून राहाता पोलिस स्टेशन गाठून झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सुनील याला अटक केली आहे. त्यानंतर छाया हिचा भाऊ सुनील तरस यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बीड शहरात अशीच एक घटना घडली आहे. घटस्फोटीत महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरू तरुणाने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी पेठ भागात घडली. सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव आहे. सुनील जाधव याचे महिलेवर एकतर्फी प्रेम आहे. या एकतर्फी प्रेमातून सुनीलने महिलेवर हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांना आरोपी सुनील जाधव याला अटक केली आहे.

First published: February 23, 2020, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading