मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Crime: जळगावात हत्या सत्र सुरूच; दगडाने ठेचून एकाची हत्या, 15 दिवसांतील चौथी घटना

Jalgaon Crime: जळगावात हत्या सत्र सुरूच; दगडाने ठेचून एकाची हत्या, 15 दिवसांतील चौथी घटना

जळगावात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, 15 दिवसांत हत्येची चौथी घटना

जळगावात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, 15 दिवसांत हत्येची चौथी घटना

Jalgaon Crime News: जळगावात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Sunil Desale
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 9 एप्रिल : जळगाव शहरातील (Jalgaon city) मेहरुण ट्रॅक परिसरात एकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या (man killed by hitting with stone) करण्यात आली आहे. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्यादरम्यान उघडकीस आली. दिनेश भिकन पाटील असे मृतकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मयत दिनेश पाटील हा सुप्रीम कॉलनीत पर्मनंट नोकरीला असल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुणी आणि कशासाठी केली याचा तपास सुरू आहे. दरम्यान 15 दिवसांत चार हत्या झाल्याने जळगाव शहर हादरले आहे. वाचा : बायकोशी भांडण झाले जवानाने 3 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटले सोमवारी एकाची चॉपरने हत्या सोमवारी शिवाजीनगर हुडको परिसरात खून झाल्याचे खळबळ उडाली. हा खुन शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपरने हल्ला करून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला? याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वाचा : बापाने मुलाला जिवंत जाळले; पाहा, पुढे काय घडलं? मार्च महिन्यात दोन हत्या जळगाव शहरातील समता नगर येथे 25 मार्च मध्यरात्री सागर पवार या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेला 24 तास पूर्ण होत नाही तोवर शहरातील शिवाजी नगर हुडको येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटनेने पुन्हा शहर हादरले आहे. नरेश आनंदा सोनवणे हा तरुण शहरातील फेडरेशन येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे शिवाजी नगर हुडको येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या शिवाजी नगर येथील घरी गेला असता, यावेळी त्याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
First published:

Tags: Crime, Jalgaon, Murder

पुढील बातम्या