मस्करी केल्याचा राग, धारदार शस्त्राने मित्रानेच केला मित्राचा खून

मस्करी केल्याचा राग, धारदार शस्त्राने मित्रानेच केला मित्राचा खून

चेष्टा मस्करी केल्याचा रागातून मिथुन चोरगे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अजय शर्मा या त्याच्या मित्राने तीक्ष्ण हत्याराने त्याची हत्या केली.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

उल्हासनगर, 16 एप्रिल : उल्हासनगरमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रा-मित्रांमध्ये चेष्टा मस्करी करताना सहज वाद झाला आणि त्यातून मित्राचीच हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. चेष्टा मस्करी केल्याचा रागातून मिथुन चोरगे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अजय शर्मा या त्याच्या मित्राने तीक्ष्ण हत्याराने त्याची हत्या केली. मिथुनने बोलताना अजयची चेष्टा केली असावी. त्याचा अजयला राग आला आणि त्याने मिथुनची हत्या केली.

हेही वाचा: घृणास्पद! दुसरीतल्या चिमुरडीचा 40 वर्षीय नराधम शिक्षकाकडून विनयभंग

या गुन्ह्याची विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात नोंद केली असून अजयविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अजयला बेड्या ठोकल्या.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मिथूनचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधित तपास करत आहेत.

नेमका कोणत्या वादावर अजय रागात मित्रालाच मारण्याचं एवढं टोकाचं पाऊल घेतलं याचा आता पोलीस तपास करत आहे. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अजयची कसून चौकशी सुरू केली आहे. तर यासंदर्भात आरोपी अजय आणि मृत मिथूनच्या इतर मित्रांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बीडमधील हाच तो VIDEO, ज्यामुळे पंकजा मुंडे सापडल्या वादात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading