पुण्यात गुंडांचा हैदोस; तरुणाचं अपहरण करून काढली नग्न धिंड, सिगारेटचे दिले चटके!

पुण्यात गुंडांचा हैदोस; तरुणाचं अपहरण करून काढली नग्न धिंड, सिगारेटचे दिले चटके!

पुण्यात खंडणीसाठी तरुणाचं अपहरण करून त्याची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 20 नोव्हेंबर : पुण्यात खंडणीसाठी युवकाचं अपहरण करून त्याची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर अपहरण करणाऱ्यांनी या तरुणाला सिगारेटचे चटकेही दिले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुण्यातलं हे क्रौर्य पाहून राज्यातल्या नागरिकांना धक्का बसला. रात्रीच्या अंधारात अपहरणकर्त्यांनी या युवकाची नग्न धिंड काढली. खंडणीसाठी अपहरण केलेल्या या युवकाला रस्त्यावरून फिरवण्यात आलं. त्याचवेळी त्याचा व्हिडिओही काढला जात होता.

अपहरणकर्ते एकमेकांशी बोलत असताना सद्दाम असा उल्लेख येतो. त्यानंतर दुसरा अपहरणकर्ता 'मालूम नहीं' असं म्हणतो. थोड्याच वेळात 'मैं इम्रान को भेज रा' असं बोलल्याचं ऐकायला येतं. अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे दोन व्हिडिओ तयार करण्यात आले.

त्यातल्या दुसऱ्या व्हिडिओत 'दोनो जगह हाथ रख' असं म्हणून लाथ मारल्याचं दिसतंय. त्यानंतर पीडित युवकाला थप्पड लगावण्यात आली. या तरुणाला नग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली.

कॅम्प परिसरातल्या या घटनेनं शहरात गुंड कोणालाच जुमानत नसल्याचं स्पष्ट झालंय. खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या युवकाला मारहाण करून सिगारेटचे चटकेही देण्यात आले. आठही अपहरणकर्ते फरार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 10:53 PM IST

ताज्या बातम्या