मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मित्र सैन्यात लागले पण रुपेशचं स्वप्न अर्धवट राहिलं, वंदे भारत एक्स्प्रेस समोरून आली आणि...

मित्र सैन्यात लागले पण रुपेशचं स्वप्न अर्धवट राहिलं, वंदे भारत एक्स्प्रेस समोरून आली आणि...

सैन्य भरतीसाठी रुपेशचे प्रयत्न सुरू होते. काही दिवसा अगोदर याचे मित्र सैन्य भरतीत लागले.

सैन्य भरतीसाठी रुपेशचे प्रयत्न सुरू होते. काही दिवसा अगोदर याचे मित्र सैन्य भरतीत लागले.

सैन्य भरतीसाठी रुपेशचे प्रयत्न सुरू होते. काही दिवसा अगोदर याचे मित्र सैन्य भरतीत लागले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 08 फेब्रुवारी : मोठा थाटामाटात सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसची दिमाखात घोडदौड सुरू आहे. मात्र, भंडारा रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाने वंदे भारत एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नैराश्यातून या तरुणाने पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर एकलारी परिसरातील रेल्वे रूटवर वंदे भारत एक्सप्रेसच्या खाली येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आहे. रुपेश चंद्रशेखर साठवणे असं युवकाचं नाव आहे.

(भरदिवसा कुऱ्हाडीचा वार, बायकोला संपवून नवरा थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, बीड हादरलं!)

सदर तरुण हा मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी आहे. सैन्य भरतीसाठी रुपेशचे  प्रयत्न सुरू होते. काही दिवसा अगोदर याचे मित्र सैन्य भरतीत लागले. परंतु, मृतक हा अपात्र ठरला. त्यामुळे या कारणावरून नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकतर्फी प्रेमातून एका 23 वर्षीय तरुणाची महाडमध्ये आत्महत्या

दरम्यान, महाड तालुक्यातील सोलमकोंड इथं एकतर्फी प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सतीश पवार असं मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते.

(लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचं घर पेटवलं; दापोलीतील घटना)

तिने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातून घरात नायलॉन रश्शीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेट्स ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडून सांगण्यात येत असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

First published: