Home /News /maharashtra /

गव्याने हल्ला करत सौरभच्या पोटात शिंग खुपसले, जागेवरच सोडला जीव, कोल्हापुरातील घटना

गव्याने हल्ला करत सौरभच्या पोटात शिंग खुपसले, जागेवरच सोडला जीव, कोल्हापुरातील घटना

 अचानक लोकांचा जमाव पाहून गवा बिथरला आणि त्याने समोर आलेल्या तरुणावर हल्ला केला. यात 21 वर्षांच्या सौरभ पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अचानक लोकांचा जमाव पाहून गवा बिथरला आणि त्याने समोर आलेल्या तरुणावर हल्ला केला. यात 21 वर्षांच्या सौरभ पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अचानक लोकांचा जमाव पाहून गवा बिथरला आणि त्याने समोर आलेल्या तरुणावर हल्ला केला. यात 21 वर्षांच्या सौरभ पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    कोल्हापूर, 11 डिसेंबर : कोल्हापूरमध्ये (kolhapur) रान गव्याचे (Gaur ) नेहमी दर्शन होत असते. पण, करवीर तालुक्यामध्ये एका गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न तरुणाच्या जीवावर बेतला आहे. रान गव्याला हुसकावून लावत असताना त्याने हल्ला केला, यात पोटात शिंग खुपल्यामुळे एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भुयेवाडीमध्ये आज संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सौरभ संभाजी पाटील (वय 21) असं गव्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रल्हाद पाटील (वय 55) आणि शुभम महादेव पाटील (वय 21) असं जखमी झालेल्या दोघांची नाव आहे, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. कालीन भैयासोबत दिसला MS Dhoni, नव्या लूकची होतेय चर्चा, पाहा Photos शुक्रवारी पंचगंगा नदीच्या काठावर हा गवा आला होता. दिवसभर तो नदी काठीच होता. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तो गावात शिरला. गावातील शिवाजी पुलावरून तो शिंगणापुरकडे गेल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आज शनिवारी संध्याकाळी हा गवा प्रल्हाद पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ आला होता. त्यावेळी प्रल्हाद पाटील यांनी त्याला पाहिले. गवा इतर जनावरांना इजा पोहोचवले म्हणून प्रल्हाद पाटील यांनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण त्याने पाटील यांच्यावर हल्ला केला. गव्याने पाटील यांना उचलून फेकले होते. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. लग्नाच्या वाढदिवशी विराटने बायकोसोबत घासली भांडी, अनुष्काने शेयर केले Photo त्यामुळे या गव्याला हुसकावून लावण्यासाठी गावातील काही तरुण पुढे आले. पण अचानक लोकांचा जमाव पाहून गवा बिथरला आणि त्याने समोर आलेल्या तरुणावर हल्ला केला. यात सौरभ पाटील हा तरुण गव्याच्या तावडीत सापडला. गव्याचे शिंग सौरभच्या पोटात खुपसले गेले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर इतर दोन जणांना जखमी केलं. हल्ला केल्यानंतर गवा सादळे-मादळे गावच्या डोंगराच्या दिशेनं पळून गेला. जखमी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या