मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खड्ड्याचा आणखी एक बळी, भयानक दुर्घटनेचा Video

4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खड्ड्याचा आणखी एक बळी, भयानक दुर्घटनेचा Video

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये हा तरुण दुचाकीवरून जाताना दिसत आहे. त्यावेळी खड्ड्यांमुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि इतक्यात समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडलं.(Thane Accident Video)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  Kiran Pharate

ठाणे 29 ऑगस्ट : ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात खड्ड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यांमुळे हा तरुण ट्रकखाली आला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना ठाण्यातील दिवा-आगासन रोडवर घडली असून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

पत्नीचा एकतर्फी प्रियकर जीवावर उठला, मुंबईच्या खार सबवेवर थरार, निरापराध पतीसोबत हे काय घडलं?

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये हा तरुण दुचाकीवरून जाताना दिसत आहे. त्यावेळी खड्ड्यांमुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि इतक्यात समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 28 ऑगस्ट रोजी घडलेल्या या संपूर्ण घटनेचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसतं, की रस्त्यावरुन वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. यादरम्यान एक ट्रक आणि दुचाकी एकमेकांना क्रॉस करताना दिसतात. इतक्यात दुचाकी एका खड्ड्यात जाते, यातून बाहेर निघताना तरुणाचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि अगदी क्षणभरातच तो ट्रकच्या चाकाखाली जातो.

जळगाव : कारच्या शर्यतीमुळे एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, तब्बल 15 फूट फेकला गेला 11 वर्षाचा चिमुरडा

हे सगळं अगदी काही क्षणातच घडतं, त्यामुळे सुरुवातीला ट्रक चालकाला या घटनेची काही कल्पनाही येत नाही. इतक्यात रस्त्याने जाणारा एक व्यक्ती ट्रक चालकाला इशारा करून थांबण्यास सांगतो. लगेचच ट्रक चालक खाली उतरतो आणि याठिकाणी मोठी गर्दी जमा होते. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. या घटनेत तरुणाला खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताची ठाण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकांनी अशा घटनांमध्ये आपले जीव गमावले आहेत.

First published:

Tags: Bike accident, Shocking accident, Thane