डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच पंकजचा मृत्यू, वैद्यकीय अहवाल आला समोर

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच पंकजचा मृत्यू, वैद्यकीय अहवाल आला समोर

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दहावीचा विद्यार्थी पंकज कदम याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अधिकऱ्यांनी तसा अहवाल दिला आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे,(प्रतिनिधी)

दापोली, 22 ऑगस्ट- डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दहावीचा विद्यार्थी पंकज कदम याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अधिकऱ्यांनी तसा अहवाल दिला आहे. दापोली तालुक्यातील टेटवली गावातील सर्पदंश झालेल्या पंकज कदम या मुलावर डॉक्टरांनी योग्य वेळी उपचार केले असते तर त्याच्यावर मृत्यू ओढवला नसता, असेही या अहवालात म्हटले आहे.

डॉक्टरच्या हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचा अहवाल वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिवदास चव्हाण यांनी दिल्याने ऑन ड्युटी डॉ. बालाजी सगरे यांना पंकजच्या मृत्यूस जबाबदार धरून निलंबित करण्यात यावे, असा लेखी अहवालही डॉ.चव्हाण यांनी दिला आहे. वैद्यकीय अहवालानंतर नातेवाईकांनी पंकजचा मृतदेह ताब्यत घेतला आहे. पंकजचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आवारातून ठेऊन नातेवाईकांनी आंदोलन केले होते. डॉ. बालाजी सगरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा मागणीही यावेळी करण्यात आली.

सर्पदंशानंतर 4 तासांनी आले होते वैद्यकीय अधिकारी

टेटवली गावातील मळेकर वाडी येथील पंकज कदम या युवकाला मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास सर्पदंश झाला होता. साप चावल्यानंतर पंकज याने स्वतः साप मारून भावंडांना झोपेतून उठवले. भावंड व काका यांच्या मदतीने दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, येथे आल्यानंतर चार तास झाले तरी डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित झाले नाही. यानंतर एक डिलिव्हरीची केस पाहण्यासाठी डॉक्टर आले असता त्यांनी पंकजला अत्यावस्थ झाल्याचे पाहून त्याला तातडीने येथून हलवा, असे नातेवाइकांना सांगितले. यानंतर नातेवाईकांनी शहरातील एका खासगी दवाखान्यात हलवले. त्यांना चिपळूण येथील डेरवण रुग्णालय गाठले. परंतु तोपर्यंत पंकजवर मृत्यू ओढवला होता. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी सायंकाळपर्यंत दापोली पोलिस स्थानकासमोर हे आंदोलन केले.

पंकज कदम या युवकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. पंकजला सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तब्बल चार तासांनी आले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पंकजचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता.

VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading