पर्यटनासाठी मनुदेवी येथे आलेल्या जळगावच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

श्रीक्षेत्र मनुदेवी येथे पर्यटनासाठी आलेल्या जळगावच्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. अशोक गोपाल सोनवणे (32, तुकाराम वाडी, पीपल्स बँकेसमोर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 08:19 PM IST

पर्यटनासाठी मनुदेवी येथे आलेल्या जळगावच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

यावल, 6 ऑगस्ट- तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी येथे पर्यटनासाठी आलेल्या जळगावच्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. अशोक गोपाल सोनवणे (32, तुकाराम वाडी, पीपल्स बँकेसमोर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.

आचारीचे काम करून कुटुंबाचा गाडा ओढणारे अशोक सोनवणे हे मंगळवारी पर्यटनासाठी श्री क्षेत्र मनुदेवी येथे दुचाकीने आले होते. दुपारी दोन वाजता ते तलावात अंघोळीसाठी उतरताच त्यांचा पाय निसटल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मित्रांनी आरडा-ओरड करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. अशोकला त्याच्या मित्रांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, वैद्यकीय अधिकारी डॉ.कळसकर यांनी त्याला मृत घोषित केले.

अशोकच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, बहीण आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, जळगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'फ्रेंडशिप डे'ला सहलीला आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Loading...

दरम्यान, 'फ्रेंडशिप डे'निमित्त श्रीक्षेत्र मनुदेवी येथे सहलीला आलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला होता. भुसावळातील 12 मित्र यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी येथे सहलीला आले होते. त्यातील एकाचा तेथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. वैभव संजय गांजले असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभवचा रविवारी दुपारी साडेतीन वाजेपासून शोध सुरु होता. सोमवारी सकाळी पाझर तलावात त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे भुसावळातील गुंजाळ कॉलनीत शोककळा पसरली होती.

रविवार सुटीचा दिवस व सोबत फ्रेंडशिप डे असल्याने भुसावळ येथील गुंजाळ कॉलनीमधील 12 तरुण यावल तालुक्याच्या पश्चिम भागात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी येथे गेले होते. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सातपुड्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिराजवळील मनुदेवी पाझर तलावाजवळ त्यांनी सगळ्यांनी जेवण केले. नंतर वैभव पोहोण्यासाठी तलावात उतरला व क्षणार्धातच तो पाण्यात बुडाला. सोमवारी वैभवचा मृतदेह सापडला.

भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...