आत्महत्येचं LIVE PHOTO Shoot, मित्राला फोटो काढायचं सांगून तरुणाने मारली नदीत उडी!

आत्महत्येचं LIVE PHOTO Shoot, मित्राला फोटो काढायचं सांगून तरुणाने मारली नदीत उडी!

नुकूल डुबे हा त्याचा मित्र सुरज गोळवे हे दोघे मोहाट या कृष्णा नदीच्या पुलावर गेले होते.

  • Share this:

किरण मोहिते, प्रतिनिधी

सातारा, 11 जानेवारी : मित्राला फोटो काढायला सांगून विद्यार्थ्याने पुलावरून नदीत उडी मारल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. नुकूल डुबे असं या तरुणाचं नाव आहे.

साताऱ्यातील जावली तालुक्यात मेढा फार्मसी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील नुकूल डुबे हा त्याचा मित्र सुरज गोळवे हे दोघे मोहाट या कृष्णा नदीच्या पुलावर गेले होते. त्या ठिकाणी गेल्यावर नुकूल याने सुरजला फोटो काढण्यास सांगितलं. मुळात नुकूल हा नदीवरील पुलाच्या कठड्या पलीकडे जाऊन उभा राहिला आणि त्याने सुरजला फोटो काढण्यास सांगितलं. सुरज जेव्हा फोटो काढणार होता, त्यावेळी त्याने त्याच्या खिशातली चिठ्ठी सुरजच्या हातात देत 'बाय' म्हणत नदीत उडी मारली.

झालेल्या प्रकारामुळे सुरज चांगलाच भयभीत झाला आणि तो मोठ्याने ओरडायला लागला. परंतु, तो पर्यंत नुकूल बुडालेला होता.

नुकूल हा मेढ्यातील फार्मसी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत असून त्याने चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं आहे. हे मात्र, नेमके समजू शकलेले नाही.

===================

First published: January 11, 2019, 7:39 PM IST

ताज्या बातम्या