'तेजाब'मधील हे गाणे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेऊन तरूणाची आत्महत्या

आई सनीला उठवण्यास गेली असता तो साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 05:00 PM IST

'तेजाब'मधील हे गाणे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेऊन तरूणाची आत्महत्या

नाशिक,5 नोव्हेंबर: नाशिक शहारातील पंचवटी-म्हसरूळ गावातील राजवाड्यात राहणार्‍या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सनी गौतम पगारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 'तेजाब' सिनेमातील 'सो गया ये जहा, सो गया आसमा' या गाण्यावर व्हिडीओ बनवून सनीने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले होते. सनीने शुक्रवारी मध्यरात्री घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईच्या साडीने लावला गळफास...

सनी गौतम पगारे हा म्हसरूळ येथील राजवाड्यात आई-वडिलांसोबत राहत होता. सनीचे वडील एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात नोकरी करतात. सनी त्यांच्या जागी नोकरीस लागणार होता. सनीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. सनीने तेजाबमधील 'सो गया ये जहा सो गया आसमा' या गाण्यावर व्हिडिओ बनवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस् ठेवले. त्याचे स्टेटस् पाहून त्याला मित्रांनी फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने कोणाचाही फोन घेतला नाही. गुरुवारी रात्री सनी दीड वाजता घरी आला. तो घराच्या माडीवर तो झोपायला गेला. मात्र, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आई सनीला उठवण्यास गेली असता तो साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

लॅबअसिस्टंटची आत्महत्या, डोक्यावर होते 60 लाखांचे कर्ज...

Loading...

23 वर्षीय तरुण लॅब असिस्टंटने विषारी औषधचे सेवन करून आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरातील हिमायतबाग परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तरुणावर डोक्यावर सुमारे 60 लाख रुपयांचे कर्ज होते, अशी चर्चा उपस्थितामध्ये होती. सोमवारी त्याने सर्वांना कॉल करून तुमचे पैशे उद्या देतो असे सांगितले होते. मात्र त्यापूर्वी त्याने आत्महत्या केली. रेहान खान जाबाज खान असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सकाळी 8 वाजेच्या सुमारास हिमायतबागमध्ये मॉर्निंगवॉकसाठी काही नागरिक जात असताना त्यांना एका झाला खाली एक तरुण मृतावस्थेत पडलेला दिसला होता. पोलिसांच्या एका पथकाने तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाजवळ एक विषारी कीटकनाशकाची रिकामी बाटली दिसली. एक धारदार कटर मिळाला. बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

VIDEO : चंद्रकांत पाटील आले समोर, सुप्रिया सुळेंनी असं केलं स्वागत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...