मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आईचे छत्र हरपले अन् तरुणी गेली नशेच्या आहारी, धूम स्टाईल मोबाईल चोरून काढला पळ पण...

आईचे छत्र हरपले अन् तरुणी गेली नशेच्या आहारी, धूम स्टाईल मोबाईल चोरून काढला पळ पण...

आईच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत ती एकटी राहत होती. एकटी राहत असताना ती नशेच्या आहारी गेली.

आईच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत ती एकटी राहत होती. एकटी राहत असताना ती नशेच्या आहारी गेली.

आईच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत ती एकटी राहत होती. एकटी राहत असताना ती नशेच्या आहारी गेली.

डोंबिवली, 17 मार्च : डोंबिवलीतील मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुणीला  पोलिसांनी अटक केली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या या तरुणीने नशेसाठी मित्रासोबत मोबाइल चोरी सुरू केली. मोबाईल स्नेचिंग करतांना तरुणीला एका डोंबिवलीकराने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. डोंबिवली पूर्वेकडील जोशी हायस्कूल परिसरात ही घटना घडली.  रात्री 12.30 च्या सुमारास गौरव टकले हा तरुण  रस्त्यावरून जात असतांना एका दुचाकीवर बसलेले तीन जण त्यांच्या जवळ आले. दुचाकीवर मध्ये बसलेल्या मुलीने गौरव यांच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि दुचाकीस्वार तरुणाने पळून जाण्यासाठी एक्सिलेटर वाढवला. त्याच वेळी गौरव याने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचे जॅकेट पकडले. यामुळे दुचाकीचालकाने नियंत्रण सुटले आणि तिघेही जमिनीवर पडले. गौरव याने जमिनीवर पडलेल्या जखमी तरुणीला पकडून ठेवलं. मात्र, या तरुणीचे दोन साथीदार धना जाधव आणि दिव्या पळून गेले. रामनगर पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळ्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून तरुणीला ताब्यात घेतलं. नंदीनी जैन असं या तरुणीचं नाव आहे.  नंदिनी ही एका चांगल्या घरातली तरुणी आहे. आईच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत ती एकटी राहत होती. एकटी राहत असताना ती नशेच्या आहारी गेली. नंदिनी नशेच्या एवढी आहारी गेली की, तिने शिक्षण सोडून नशेबाज मित्रांसोबत चोरी सुरू केली.  पोलिसांनी या तरुणीची चौकशी सुरू केली असून तिच्या  दोन साथीदारांचा शोध घेत आहे. गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी बुलेटसह 17 महागड्या गाड्या केल्या गायब दरम्यान, गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी  चोरीचा मार्ग पत्कारून एका चोरट्याने साथीदारांच्या मदतीने तब्बल 17  महागड्या दुचाक्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्याला त्याच्या साथीदारासह कोनगाव पोलिसांनी शिताफीने सापळा रचून दोघांनाही बेड्या ठोकल्याची माहिती भिवंडी  पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या चोरट्याने भिवंडी परिसरातून चोरी केलेल्या दुचाक्या रातोरात पुणे, सोलापूरसह कर्नाटक राज्यात आपल्या परिचितांना अवघ्या 4  ते 10 हजार रुपयात विक्री करीत होते. या पैशातून आपल्या मौज मजेसह मैत्रिणीवर प्रभाव टाकण्यासाठी खर्च केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मसू उर्फ पिंटू राम मोरे (वय, 24 रा. रांजणोली,  भिवंडी ) हा मूळचा सोलापूर जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तर प्रदीप हनुमंत क्षेत्री (वय 19, रा. पिंपळघर ,भिवंडी ) असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे.  या दोघाकडून कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या 6 आणि नारपोली येथील  1 अशा 7 गुन्ह्यांचा शोध लागला असून इतर वाहन चोरीबाबत पोलीस माहिती घेत आहे. या दोघांकडून जप्त केलेल्या 17 दुचाकींमध्ये 8  रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या बुलेटचा समावेश असून 3 पल्सर, 2 पॅशन प्रो, 3 होंडा स्प्लेंडर आणि 1 होंडा शाईन गाड्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुचाकी चोरी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर,पोलीस निरीक्षक गुन्हे संजय साबळे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पो.ना. किरण पाटील, गिरीष पवार, संतोष पवार, पो.शी. भागवत दफीफळे , नरेंद्र पाटील, कृष्ण महाले , अविनाश पाटील या पोलीस पथकाला गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक मदतीने मुंबई - नाशिक मार्गावरील सरवली येथील बासुरी हॉटेलसमोर चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी सापळा लावून मसू उर्फ पिंटू याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता. त्याने मौज मजा आणि  गर्लफ्रेंडला विविध दुचाक्यांवर फेरफटका मारून तिच्यावर इम्प्रेशन  मारण्यासाठी त्याने 17 दुचाक्या चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे.  तर या चोरट्याचे आणखी २ साथीदारांची नावं पोलीस तपासात समोर आली आहेत. तर कोनगाव पोलिसांनी या दुकलीकडून आतापर्यत 17 दुचाक्या हस्तगत केल्या असून त्यासोबत कोनगाव पोलीस ठाण्यात विविध ठिकाणी बेवारस सोडून दिलेल्या 11 दुचाकी आढळून आलेल्या जप्त केल्या असून त्याद्वारे मौजमजेसाठी दुचाकी फिरवून जिथं पेट्रोल संपेल तिथं सोडून देण्याच्या पद्धतीने या दुचाक्या आढळून आल्या असून ज्यांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात येऊन आपल्या वाहनांची खात्री करावी, असं आवाहन भिवंडी  पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केलं आहे.
First published:

Tags: Dombivali

पुढील बातम्या