आसिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली, 12 ऑक्टोबर : पुराच्या पाण्यातून मार्ग काढणं कधीही धोक्याचंच. असंच केलेलं साहस एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं.
मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. पुराचं पाणी नदीवरून वेगानं वाहत असतानाच बाईकचालक त्याच्या बाईकसह पुढे गेला. कवठेमहांकाळमधल्या अग्रणी नदीला पूर आलेला असताना ही व्यक्ती पुरातून बाईक ढकलत पुढे निघाली.
पुलावरून वेगानं पाणी वाहतच होतं. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे बाईकवरील त्याची पकड ढिली पडली. बाईक पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहायला लागली. बाईक वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र ते प्रयत्न तोकडे पडले. बाईकसोबत वाहून जाण्याचा धोका असल्यानं त्यानं ती सोडून दिली.
अखेर बाईक पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर पुलावरून वाहत जात नदीत कोसळली. बाईक वाहून गेली मात्र बाईकस्वाराचे प्राण वाचले. पुलावरून पाणी वाहत असताना त्यावरून वाहन घेऊन जाणं किंवा दुचाकी दामटणं धोक्याचं असतं. तरीही अनेक जण हा धोका पत्करतात. पण प्रेक्षकांना असला धोका तुम्ही कधीच पत्कारू नका.
=================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा