Home /News /maharashtra /

भरधाव बाइकने आधी उडवलं आणि वर केली जबर मारहाण; साताऱ्याचा भयंकर CCTV VIDEO बघून होईल संताप

भरधाव बाइकने आधी उडवलं आणि वर केली जबर मारहाण; साताऱ्याचा भयंकर CCTV VIDEO बघून होईल संताप

रस्ता ओलांडताना (While crossing road) भरधाव आलेल्या दुचाकीने (Rash two wheeler) जोरदार धडक (Dash) दिल्याने एक वृद्ध (Senior citizen) लांब उडून पडला.

सातारा, 16 सप्टेंबर : रस्ता ओलांडताना (While crossing road) भरधाव आलेल्या दुचाकीने (Rash two wheeler) जोरदार धडक (Dash) दिल्याने एक वृद्ध (Senior citizen) लांब उडून पडला. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याला सावरून रस्त्याच्या कडेला आणले असता बाईकचालक तिथे आला आणि त्याने त्या वृद्धाला जोरदार मारहाण केली. या सगळ्यात चूक कुणाची ही चर्चा रंगली असली तरी बाईकस्वाराने दाखवलेल्या मुजोरीबाबत जोरदार संताप व्यक्त करण्यात येत आहे. असा घडला अपघात सातारा शहरातील शनिवार पेठ परिसरात ही घटना घडली. शहरातील राजपथावर रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला एका भरधाव दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या धडकेत वृद्ध लांब उडून पडला. जखमी वृद्धाला पादचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला आणलं आणि त्याची विचारपूस केली. मात्र तेवढ्यात बाईकस्वार त्या वृद्धापाशी आला आणि दादागिरी करू लागला. रस्त्यात गाडीला का आडवा आला या कारणावरून दुचाकीस्वराने चक्क लाथा आणि बुक्क्यांनी वृद्धाला मारहाण केली.. ही संपूर्ण घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली. हा दुचाकीस्वार हा सातारा शहरातच राहणारा असून या केलेल्या कृत्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सातारा पोलिसांनी याचा शोध घ्यावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. शहरात वेगाने बाईक चालवणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यांच्या दादागिरीचे प्रमाणही वाढत चालल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शहर पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या बाईकस्वारांना अद्दल घडवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. पोलीस आता वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. हे वाचा - Corona Alert : लसीची परिणामकारकता हळूहळू होते कमी, अनेक देशांत तिसरा डोस सुरू पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तरुणाचा शोध सुरू केला आहे. लवकरच तरुणाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
Published by:desk news
First published:

Tags: Accident, Crime, Satara (City/Town/Village)

पुढील बातम्या