बसमध्ये मुलींना देत होता धक्के, महिला कंडक्टरने हटकल्यावर उचलला हात

बसमध्ये मुलींना देत होता धक्के, महिला कंडक्टरने हटकल्यावर उचलला हात

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या गारडगाव येथून खामगावकडे येणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा,  28 डिसेंबर : विद्यार्थिनींना धक्के देत पुढे जाणाऱ्या युवकाला महिला बस कंडक्टरने हटकले असता युवाकाने महिलेला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी सकाळी खामगाव तालुक्यातील गारडगाव ते खामगाव दरम्यान बसमध्ये घडली. त्यानंतर एसटी बस थेट खामगाव पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली आणि आरोपी युवकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश वानखडे असं या आरोपी युवकाचे नाव आहे. तसंच हा युवक नेहमीच बसमध्ये महिलांची आणि विद्यार्थिनीची छेड काढत असल्याची माहिती काही मुलींनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या गारडगाव येथून खामगावकडे येणाऱ्या एम एच 40 एन 9695 बस क्रमांक यामध्ये शाळेच्या मुली आणि प्रवासी प्रवास करीत असताना गारडगाव येथून आकाश वानखेडे नामक युवक बसमध्ये चढला. बसमध्ये चढल्यानंतर विद्यार्थिनींना धक्के देत तो पुढे जात असताना बसच्या महिला वाहक कल्पना सिसोदे यांनी त्याला हटकून, 'मुलींना धक्के का देतो', असं विचारलं असता, आकाश वानखेडे याने महिला बस वाहकला मारहाण केली.

एवढंच नव्हे तर अश्लील शिवीगाळही केली. या प्रकारातून महिला वाहकाच्या नाकातून रक्त जात असल्यानं चालकानं प्रसंगावधान राखत सदर बस थेट पोलीस स्टेशनच्या आवारात नेऊन उभी केली.

त्यानंतर मारहाण करणाऱ्या युवकाला पोलिसांच्या हवाली केले याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस आता आरोपीविरुद्ध कलम 353, 332,294 भादंवि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मात्र,  40 च्या वर प्रवाशांसमोर आरोपीने महिलांना लाजवेल अश्या स्वरूपात अश्लील शिवीगाळ केली आहे. याबद्दलचा  व्हिडिओही एक प्रवाशांने रेकॉर्ड केला असून पोलिसांना दिला असताना सुद्धा गुन्हे मात्र तसे दाखल झालेले नाही. यामुळे या प्रकरणात कुठं तरी पाणी मुरविल्या जात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading