Home /News /maharashtra /

शेतात गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण करून पाजलं विष, मृत्यूशी झूंज सुरू

शेतात गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण करून पाजलं विष, मृत्यूशी झूंज सुरू

शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करत विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिर्डी, 11 मार्च: शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करत विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून वावी पोलिस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोपरगावच्या मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या या सोळा वर्षीय तरूणाला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. अतिशय खळबळजनक ही घटना सिन्नर तालुक्यात घडली आहे. नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या विघणवाडी परिसरात राहणाऱ्या शरद क्षीरसागर यांचा मुलगा मंगळवारी मध्यरात्री आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. शेतात दबा धरून बसलेल्या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला विष पाजलं. कशीबशी सुटका करून हा तरूण आपल्या घरी पोहोचला त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला कोपरगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. हेही वाचा..राज्यसभेच्या 'त्या' जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी? शरद पवार विधानभवनात दाखल या प्रकरणी वावी पोलिसांनी आरोपी माधव बाळासाहेब जोरे, वसंत निवृत्ती जोरे, नामदेव जोरे आणि शिवाजी जोरे या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 328, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या अगोदरही या आरोपींनी आमच्या क्षीरसागर परिवारातील लोकांना मारहाण केली होती. वारंवार आमच्यावर दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शरद क्षीरसागर यांनी केली आहे. कोपरगाव येथील मुळे हॉस्पिटलमध्ये तरुणाची मृत्यूशी झूंज सुरू असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर चारही आरोपी पसार झाले आहेत पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकणाचा दुहेरी तपास करावा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हेही वाचा..बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं..
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ahmednagar, Ahmednagar news, Crime news, Latest news, Maharashtra news, Poison

पुढील बातम्या