एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, तरुणाने केली आत्महत्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, तरुणाने केली आत्महत्या

गोकुळदासनेही स्वत: वरही चाकूने वार केले. तत्पूर्वी त्याने विष प्राशनही केलं होतं. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

सिंधुदुर्ग 12 मे : एकतर्फी प्रेमातून युवकाने एका तरुणीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलीय. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर गोव्यात उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर तरुणाने स्वत:वरही चाकूचे वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला.

गोकुळदास काळसेकर असं या हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. तो 26 वर्षांचा होता. त्यानेच तरुणीवर हल्ला केलाय . वझरे काळसेकरवाडी इथली ही घटना आहे. गोकुळदासचे त्याच वाडीतील्या एका तरुणीवर प्रेम होतं. रविवारी ही तरुणी गावातल्याच एका विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. गोकुळदास हा तिचा पाठलाग करत विहिरीवर गेला. तिथे त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

त्या तरुणीने त्याला अनेकदा समजविण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिला वारंवार त्रास देत असे. भांडणानंतर रागाच्या भरात गोकुळदासने या तरुणीवर चाकूने सपासप वार केले.

या हल्ल्यात तरुणी घायाळ होउन पडली असल्याचं लक्षात येताच गोकुळदासनेही स्वत: वरही चाकूने वार केले. तत्पूर्वी त्याने विष प्राशनही केलं असल्याचीही माहिती पुढे आलीय. नंतर ही माहिती पसरताच तिथे गावकरीही जमले पण तोपर्यंत गोकुळदासचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यानी गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने गोवा मेडिकल कॉलेज मध्ये भरती केलं. तिच्यावर तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.  या घटनेमुळे संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरून गेलाय.

First published: May 12, 2019, 10:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading