Home /News /maharashtra /

'तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं'; जालन्यात महिलेचा विनयभंग करत केली मारहाण

'तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं'; जालन्यात महिलेचा विनयभंग करत केली मारहाण

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime in Jalna: जालना जिल्ह्यातील सेलगाव याठिकाणी एका महिलेचा विनयभंग करत मुलीच्या नातेवाईकाकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जालना, 25 मे: 'तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग' असं म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी एका महिलेचा विनयभंग (Woman Molestation) करत तिला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पुतण्या आणि आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमसंबंध (Love affair) होते. घरचे लग्नाला विरोध करतील, म्हणून संबंधित प्रेमी युगुलानी गावातून पळ काढला होता. हाच राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरच्यांना मारहाण केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे. संबंधित घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील सेलगाव येथील आहे. 35 वर्षीय पीडित महिला सोमवारी सायंकाळी आपल्या घरासमोरील ओसरीत बाजेवर झोपली होती. यावेळी गावातील सोपान श्रीमंत लिपणे पीडितेच्या घरी आला. यावेळी त्यानं पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवून नेलं आहे; तो कुठे आहे? सांग म्हणत आरोपीनं पीडितेला बेदम मारहाण केली आहे. हे ही वाचा-युवकांचा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर हल्ला; आधी भररस्त्यात कपडे फाडले, मग... आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं जीवे मारण्याची धमकी देत घरासमोर दुचाकीचं नुकसानही केलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी  सोपान श्रीमंत लिपणे विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास जमादार एस बी बिक्कड हे करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beating retreat, Crime news, Woman

    पुढील बातम्या