प्रेयसीची छेड काढल्याच्या रागातून सख्ख्या थोरल्या भावानच केली धाकट्या भावाची हत्या

प्रेयसीची छेड काढल्याच्या रागातून सख्ख्या थोरल्या भावानच केली धाकट्या भावाची हत्या

टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने केलेले गुन्हे युट्यूबवर बघून एका भावाने आपल्या 17 वर्षीय सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केली.

  • Share this:

हैदर शेख, (प्रतिनिधी)

चंद्रपूर, 14 जुलै: टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने केलेले गुन्हे युट्यूबवर बघून एका भावाने आपल्या 17 वर्षीय सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केली. मृतदेह फिल्मी स्टाईलने जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.

बहुचर्चित अनिकेत रामटेके हत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. दुर्गापूर परिसरात आढळला पुरलेला मृतदेह पावसामुळे उघडा पडल्यामुळे या हत्या प्रकरणाला वाचा फुटली आहे. अनिकेत रामटेके याचा मारेकरी दुसरा-तिसरा कोणी नसून त्याचा सख्ख्या मोठा भाऊ आहे. प्रेयसीची छेड काढल्याच्या रागातून सख्या मोठ्या भावाने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा...वांझोटं निघालं सोयाबीनचं बियाणं, कृषी संचालक कार्यालयात मनसेचा तुफान राडा

काय आहे प्रकरण?

दुर्गापूरच्या वेताळ चौक भागात वास्तव्याला असलेल्या या रामटेके कुटुंबातील 2 सख्ख्या भावांची कहाणी दुर्दैवी आणि फिल्मी स्टाईल हत्येचा नमुना ठरली आहे. रामटेके कुटुंब वास्तव्याला असलेल्या भागातील सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्याला दिली. जमिनीतून एक मानवी हात बाहेर आला असल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

तहसीलदारांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत हा खड्डा पुन्हा एकदा खणण्यात आला. यात या भागात 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनिकेत विपुल रामटेके या 17 वर्षीय मुलाचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुप्त सूचना काढून या हत्येमागे कोण असावे याचा कयास बांधला. रामटेके यांच्या घरातील 21 वर्षीय मोठा मुलगा अंकित बेपत्ता असल्याचे उघड झालं.

एकीकडे अनिकेत बेपत्ता असल्याची पोलिसांत असलेली तक्रार आणि दुसरीकडे पुरलेला मृतदेह काढताच बेपत्ता झालेला सख्खा मोठा भाऊ यात पोलिसांनी कनेक्शन जोडून पाहिलं. रामटेके कुटुंबात असलेल्या आईला मात्र यापैकी कशाची माहिती नव्हती.

खबऱ्यांचे जाळे विणून लपून बसलेल्या अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याने दिलेल्या कबुली जबाबात आपणच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची माहिती त्याने दिली. टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवलं.

सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात आरोपी अंकित यानं अनिकेत याला खूप दारू पाजली. नंतर त्याचा गळा आवळून खून केला. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं घरातच अनिकेत याचा मृतदेह पुरला. मृतदेह लवकर कुजावा म्हणून युरिया आणि इतर साहित्य देखील या खड्ड्यात टाकलं. एवढेच नव्हे तर आरोपी अंकित याने एक कुत्रा मारून तोही याच घटनास्थळी फेकला होता. ज्यामुळे दुर्गंधी परसली आणि स्थानिक नागरिकांची दिशाभूल झाली.

हेही वाचा...अजित पवारांच्या 'बारामती पॅटर्न'ला तडा, उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन

मात्र, मुसळधार पावसानं अकिंत याचं बिंग फोडलं. 15 दिवसांनी अनिकेत बेपत्ता असल्याचा बनाव उजेडात आला. पोलिसांना घटनास्थळी मृतदेह कुजण्यासाठी आवश्यक साहित्यासह डांबर गोळ्याही आढळून आले आहेत. अवैध दारू विक्रीसाठीच्या बाटल्या लपवण्यासाठी हा खड्डा खोदला होता, त्याच खड्ड्यात अनिकेत याला पुरल्याचं आरोपीनं पोलिसांनी माहिती दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 14, 2020, 8:46 PM IST

ताज्या बातम्या